शिपाईच करताहेत रुग्णसेवा

By Admin | Updated: January 29, 2015 00:13 IST2015-01-28T21:58:12+5:302015-01-29T00:13:46+5:30

अजब प्रकार : ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचे अतोनात हाल

Simply use patient services | शिपाईच करताहेत रुग्णसेवा

शिपाईच करताहेत रुग्णसेवा

देव्हारे : मंडणगड येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये रात्री डॉक्टर उपलब्ध नसल्याने रूग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिकांमधे मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे.मंडणगड तालुक्यातील सर्वच ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभाराचा हा एक मासलेवाईक नमुना आहे. तालुक्याच्या ठिकाणीअसलेल्या ग्रामीण रूग्णालयांमध्ये रात्री डॉक्टर व नर्स सेवेमध्ये उपलब्ध नसल्याचे दिसून येते. त्यामुळे येथे दाखल असलेल्या रूग्णांवर सेवेमध्ये असलेल्या शिपायांना रूग्णांची सेवा करावी लागते. रूग्णांना सलाईन लावण्याचे कामही त्यांना करावे लागत असल्याचा प्रकार मंडणगड ग्रामीण रूग्णालयामध्ये उघड होत आहे. या ठिकाणी रात्र पाळीसाठी एक डॉक्टर व एक नर्स यांची नियुक्ती असते. मात्र, हे दोघेही रात्री रूग्णांना तपासण्यासाठी किंवा त्यांच्या देखरेखीसाठी उपलब्ध नसल्याचे पाहावयास मिळत आहे.रात्रीच्या वेळी एखादा रुग्ण भरती असेल, त्याच्या आजारामधे फरक पडत नसेल, तर त्या रुग्णाला आपले दुखणे सहन करावे लागते. रात्रभर येथे रूग्णांच्या सेवेसाठी राहण्यास आम्ही बांधील नाही, असा परोपकारी सल्ला येथील डॉक्टर रूग्णांच्या नातलगांना देत असल्याचे सध्यातरी निदर्शनास येत आहे. डॉक्टर किंवा नर्स रात्री उपलब्ध नसल्याने, रूग्णालयामधे भरती असलेल्या दहा - बारा रूग्णांची सलाईन बदलण्यासारखी कामे सेवेमध्ये असलेल्या शिपायांना करावी लागतात़ त्यामुळे एखाद्या वेळेस चुकीचा उपचार होण्याचा धोका अधिक आहे़ डॉक्टरांना सेवेबाबत विचारण केली असता, आम्हालाही कुटुंब आहे. आम्ही येथे रात्रभर राहू शकत नाही, अशी गोंडस कारणे वैद्यकीय अधिकारी रूग्णांच्या नातलगांना देत असतात. मंडणगड रूग्णालयामध्ये हा प्रकार गेली अनेक वर्ष सुरू असल्याचे ऐकावयास मिळत आहे. या ठिकाणी रात्रीसाठी डॉक्टरांची नियुक्ती आहे. मात्र, रूग्णांच्या केसपेपरवर औषधांची माहिती लिहून झाल्यावर, ती औषधे देण्यासाठी डॉक्टर किंवा नर्स नसल्याने शिपाई आपले कर्तव्य समजून रूग्णांची सेवा करत असल्याचे पाहावयास मिळत आहे. या सर्व गोष्टींमळे रूग्णांची परवड होत आहे.या सर्व बाबींचा विचार करता, येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक रूग्णाला समाधानकारक सेवा मिळावी. तसेच रात्रीसाठी डॉक्टर व नर्स सेवेत उपलब्ध असावेत, अशी मागणी परिसरातील रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)

रुग्णांचा सवाल...
रुग्णांची सेवा करण्यासाठी डॉक्टरांची पुरेशी संख्या नसल्याची ओरड तेथील डॉक्टर्सकडून करण्यात येत आहे. याबाबत वारंवार प्रयत्न करूनही याठिकाणी रिक्त पदे भरण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. गोरगरीब रुग्णांसाठी शासकीय रुग्णालये वरदान ठरत आहेत. मात्र, संबंधित रुग्णालयातील रिक्तपदांमुळे येथील सेवा विस्कळीत झाली असल्याचा कारभार पाहायला मिळत आहे. रुग्णालयातील रिक्त पदे भरल्यास अशी वेळ येणार नसल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: Simply use patient services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.