चिपळुणात साधेपणाने बुद्ध पौणिमा साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST2021-05-28T04:23:37+5:302021-05-28T04:23:37+5:30
चिपळूण : तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती शाखा क्रमाक १ यांच्यातर्फे शाखा अध्यक्ष सिद्धार्थ परशुराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शासनाचे नियम ...

चिपळुणात साधेपणाने बुद्ध पौणिमा साजरी
चिपळूण : तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती शाखा क्रमाक १ यांच्यातर्फे शाखा अध्यक्ष सिद्धार्थ परशुराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शासनाचे नियम पाळून साधेपणाने बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. तालुक्यात विविध ठिकाणी याच पद्धतीने कार्यक्रम झाले.
या कार्यक्रमांतर्गत राजू जाधव यांच्या हस्ते धम्म ध्वज फडकविण्यात आला. तर शंकर जाधव, अध्यक्ष सिद्धार्थ जाधव, उपासक राजेंद्र जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आला. भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना महेंद्र जाधव व मयूरी जाधव यांनी पुष्पहार अर्पण केला. पूजा पाठ, सूत्रपठण धम्म कमिटीचे माजी अध्यक्ष प्रभाकर सकपाळ यांच्या उपस्थित केले. राजू जाधव, प्रभाकर सकपाळ, अध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांनी उपस्थित उपासक, उपासिका यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, युवा कार्यकर्ते फैसल पिलपिले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर मोहिते यांनी केले.
---------------------------
चिपळूण तालुक्यातील पाग बौद्ध कॉलनी येथील धम्म दीप बुद्ध विहार येथे बुद्ध पौर्णिमा कार्यक्रम साधेपणाने पार पडला़