याकूब बाबा यांचा उरूस साधेपणाने साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:30 IST2021-03-21T04:30:13+5:302021-03-21T04:30:13+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क दापोली : तालुक्यातील उटंबर डायरा येथील शर्वरी याकूब बाबा यांच्या दर्ग्यात शनिवारी हिंदू-मुस्लीम धर्मीयांतर्फे साधेपणाने उरूस ...

Simple celebration of Yakub Baba's Urus | याकूब बाबा यांचा उरूस साधेपणाने साजरा

याकूब बाबा यांचा उरूस साधेपणाने साजरा

लाेकमत न्यूज नेटवर्क

दापोली : तालुक्यातील उटंबर डायरा येथील शर्वरी याकूब बाबा यांच्या दर्ग्यात शनिवारी हिंदू-मुस्लीम धर्मीयांतर्फे साधेपणाने उरूस साजरा करण्यात आला.

याकूब बाबा यांचा उरूस उत्सव कमिटीने रद्द केल्याचे जाहीर केले होते. परंतु, दर्ग्यातील पूजा पार पडली. शर्वरी याकूब बाबा यांच्या दर्ग्याला हिंदू धर्मीयांचा नैवेद्याचा मान असतो. केळशी तसेच उटंबर चिंचवळवाडी येथील हिंदू बांधव उरूसाच्या दिवशी नैवद्य दाखवितात. बाबा यांच्या उरुसाची प्रमुख जबाबदारी मुस्लिम बांधवांची असते तर प्रथेप्रमाणे उरुसाचा मान हिंदूधर्मीयांना दिला जातो. उरुसाच्या दिवशी दर्ग्यावर हिंदू-मुस्लीम या दोन्ही धर्मीयांकडून चादर चढवली जाते. दरवर्षी केळशी, उटंबर, डायरा या परिसरात संदल काढली जाते. तसेच कव्वालीचा कार्यक्रम आयाेजित करण्यात येताे. मात्र, काेराेनामुळे हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले हाेते.

Web Title: Simple celebration of Yakub Baba's Urus