शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

silver oak attack: चिपळुणात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून निषेध, पण चर्चा ‘टायमिंग’चीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 14:42 IST

पुरेशी संख्या हाेण्याआधी, पदाधिकाऱ्यांना वेळ देईपर्यंत तालुकाध्यक्षांनी माेजक्याच लाेकांच्या उपस्थितीत आंदाेलन उरकून घेतले.

चिपळूण : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबई सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याचा चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चिंचनाका येथे निषेध केला. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात घोषणा देत पाेलीस स्थानकापर्यंत मोर्चा काढून पोलिसांना निवेदन देण्यात आले.मात्र, पुरेशी संख्या हाेण्याआधी, पदाधिकाऱ्यांना वेळ देईपर्यंत तालुकाध्यक्षांनी माेजक्याच लाेकांच्या उपस्थितीत आंदाेलन उरकून घेतले. त्यामुळे या माेर्चात राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांचे ‘टायमिंग’ जुळले नसल्याची चर्चा रंगू लागली आहे.एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट शुक्रवारी आक्रमक झाला हाेता. या गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पलफेकही केली. या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यासाठी शनिवारी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चिंचनाका ते चिपळूण पोलीस स्थानकापर्यंत मोर्चा काढला.चिपळुणातील चिंचनाका येथे सकाळी ११ वाजता जमण्याचे निश्चित करण्यात आले. दहा मिनिटात सुमारे ५० जण त्याठिकाणी एकत्र आले. परंतु, पुरेशी संख्या हाेण्याआधीच तालुकाध्यक्षांनी घाई सुरु केली. अवघे दाेन मिनिट थांबून तालुकाध्यक्षांनी साऱ्यांना घेऊन माेर्चा काढला. हा माेर्चा अर्ध्या वाटेवर पाेहाेचल्यानंतर खेर्डी, पाेफळी भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते चिंचनाक्यात आले. मात्र, तेथे काेणीच नसल्याचे पाहून नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्येच वेळेचे गणित न जमल्याने माेजक्याच लाेकात हा माेर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीST Strikeएसटी संपSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसChiplunचिपळुण