रत्नागिरी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्षपदी सिध्देश शिवलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:20 IST2021-07-19T04:20:36+5:302021-07-19T04:20:36+5:30

रत्नागिरी : रत्नागिरी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी सिध्देश शिवलकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत ...

Siddesh Shivalkar as Ratnagiri Nationalist Youth Taluka President | रत्नागिरी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्षपदी सिध्देश शिवलकर

रत्नागिरी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्षपदी सिध्देश शिवलकर

रत्नागिरी : रत्नागिरी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी सिध्देश शिवलकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवलकर यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुझा, ज्येष्ठ नेते राजाभाऊ लिमये, पक्षप्रतोद सुदेश मयेकर व बेसिक तालुकाध्यक्ष राजन सुर्वे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

जिल्हा निरीक्षक बबन कनावजे, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस अजित यशवंतराव, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, महिला जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण, विधानसभा निरीक्षक निखील शिंदे, जिल्हा सरचिटणीस बबलू कोतवडेकर यांनी सिध्देश शिवलकर यांना शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी युवक तालुकाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र घेताना पावस विभाग अध्यक्ष सज्जन लाड, युवक तालुका उपाध्यक्ष नीलेश खोराटे, युवा शहराचे नेते नाैसीन काजी, शहर चिटणीस लिलाधर नागवेकर, उद्योजक ताैसिफ डिंगणकर उपस्थित होते.

आमदार शेखर निकम यांनी चर्चेदरम्यान रत्नागिरी तालुक्यामध्ये युवक संघटन मजबूत करण्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Siddesh Shivalkar as Ratnagiri Nationalist Youth Taluka President