शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे रत्नागिरीमध्ये निदर्शने 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 17:40 IST

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे गुरूवर्य भिडे गुरूजी सन्मान महामोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजन करण्यात आले होते.

 रत्नागिरी - संभाजी भिडे गुरूजी यांच्यावरील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, या सर्व आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता करावी, तसेच हिंदुत्वाचे कार्य करणारे मिलींद एकबोेटे, धनंजय देसाई, विरेंद्र तावडे यांची त्वरीत मुक्तता करावी, या मागणीसाठी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेतर्फे मारूती मंदिर येथील शिवपुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे गुरूवर्य भिडे गुरूजी सन्मान महामोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजन करण्यात आले होते. मात्र, खेड येथील  घटनेमुळे प्रशासनाकडून या मोर्चासाठी परवानगी नाकारण्यात आल्याने मारूती मंदिर येथील शिवपुतळ्याजवळ कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी संघटनेच्या मागण्यांचे वाचन करण्यात आले. 

भीमा कोरेगाव येथील गोविंद महाराज समाधीजवळ लावलेल्या वादग्रस्त फलकाविषयी सखोल चौकशी व्हावी, सामाजिक अस्वस्थता निर्माण करणारे जिग्नेश मेवाणी, उमर खालीद, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, माजी न्यायमुर्ती कोळसेपाटील आदींना ताबडतोब अटक करावी, मुंबईतील कोम्बींग आॅपरेशनमध्ये सापडलेल्या चार नक्षलवाद्यांचा दंगलीशी असलेल्या सहभागाचा सरकारने खुलासा करावा, वढू बुद्रुक येथे सापडलेल्या कादीरखान नावाच्या बनावट आधारकार्डचा तपास व्हावा, राहूल फटांगडे या तरूणाच्या खुनाविषयी सखोल तपास करून मारेकºयांवर तत्काळ कारवाई व्हावी, भिडेगुरूजींच्या विरोधात खोटी तक्रार दाखल करणाºया महिलेची सखोल चौकशी व्हावी आदी मागण्यांसह संभाजी भिडे गुरूजी यांच्यावरील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, या सर्व आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता करावी, तसेच हिंदुत्वाचे कार्य करणारे मिलींद एकबोेटे, धनंजय देसाई, विरेंद्र तावडे यांची त्वरीत मुक्तता करावी, या प्रमुख मागणीचा या निवेदनात समावेश आहे.

 संघटनेच्या या प्रमुख ११ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांना शिष्टमंडळातर्फे देण्यात आले. या शिष्टमंडळात श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे रत्नागिरीचे अध्यक्ष राकेश नलावडे, खेडचे प्रशांत खातू, चिपळूणचे अजिंक्य ओतारी, रत्नागिरीचे ओंकार पुसाळकर, श्रीपाद मराठे यांचा समावेश होता.

या निदर्शनावेळी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे धारकरी कौस्तुभ सावंत, मुकुंद जोशी, अनिल जठार, सुशिल पवार, अमित चव्हाण, सागर साळवी, शुभम साखरकर,  अभिजीत पवार, विनोद केतकर यांच्यासह सुमारे १०० कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीRatnagiriरत्नागिरीMaharashtraमहाराष्ट्र