शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीसाठी झाडली रत्नागिरीतील व्यावसायिकावर गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 14:57 IST

रत्नागिरी शहरातील नॅशनल मोबाईल दुकानाचे मालक मनोहर सखाराम ढेकणे यांच्यावर त्याच्या घराखालीच कारमधून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. यामध्ये त्यांच्या पोटाला गोळी लागल्याने त्यांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देखंडणीसाठी झाडली रत्नागिरीतील व्यावसायिकावर गोळी मनोहर ढेकणे यांच्या पोटातील गोळी काढली, सहा तासाची शस्त्रक्रिया

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील नॅशनल मोबाईल दुकानाचे मालक मनोहर सखाराम ढेकणे यांच्यावर त्याच्या घराखालीच कारमधून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. यामध्ये त्यांच्या पोटाला गोळी लागल्याने त्यांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे.

रात्री सहा तासाच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या पोटातील गोळी बाहेर काढण्यात आली. खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेला नामचित गुंड सचिन जुमनाळकर याने खंडणीसाठी ही गोळी झाडल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच शहरभर नाकाबंदी केली होती.मनोहर ढेकणे हे नेहमी प्रमाणे आठवडा बाजार येथील आपले दुकान बंद करुन ९.३० वाजण्याच्या सुमारास दुकानातून बाहेर पडले. ते बंदर रोड येथील फडके उद्याननजिक इमारतीमध्ये राहतात. इमारतीखाली पाक्रिंगमध्ये ते मोबाईलवर बोलत असताना चारचाकी कार येऊन त्यांच्यासमोर थांबली. त्यातून एक तरुण खाली उतरला. त्याने त्यांच्यावर थेट गोळीबार केला.

या हल्ल्यात ढेकणे यांच्या पोटात गोळी लागली. ते जखमी अवस्थेत खाली कोसळले. गोळीबाराच्या आवाजाने स्थानिक नागरिकांनी तेथे धाव घेतली. त्यांचा मुलगा राहुल तेथे आला. तर गोळीबार करून पळून गेलेल्या लोकांचा पाठलाग केला. मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले.प्राथमिक चौकशीत सराईत गुन्हेगार सचिन जुमनाळकर याचे नाव पुढे आले आहे. खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना पेरोलवर सुटल्याचे पोलिसांनी सांगितले. कारागृहात असल्याने सचिनकडे पैसे नसल्यामुळे त्याने खंडणीतून हा गोळीबार केल्याचा अंदाज आहे.सहा तास शस्त्रक्रियामनोहर ढेकणे यांच्या पोटातील गोळी काढण्यासाठी जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करण्यात आली. तब्बल सहा तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. सहा तासानंतर त्यांच्या पोटातील गोळी बाहेर काढण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून, या शस्त्रक्रियेसाठी चार सर्जन, दोन भूलज्ज्ञ आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता.रत्नागिरीत आला केव्हा?सचिन जुमनाळकर रत्नागिरीत केव्हा आला ? तो कोणाच्या संपर्कात होता ? त्याच्या सोबत गाडीत अन्य कोण होते? गाडी नेमकी कोणाची होती याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी