किनारा सुरक्षेवर भर
By Admin | Updated: October 18, 2015 00:20 IST2015-10-18T00:19:57+5:302015-10-18T00:20:34+5:30
पोलीस सज्ज : बुरडेंचे सहकार्याचे आव्हान

किनारा सुरक्षेवर भर
चिपळूण : मुंबईत झालेला बॉम्बस्फोट व २६/११ ला झालेला अतिरेकी हल्ला हा सागरी किनारी भागातून झाला. त्याची दखल घेऊन शासनाने कठोर पावले उचलली आहेत. शासन स्तरावर योग्य ती अंमलबजावणी सुरू आहे. किनारा सुरक्षेवर विशेष भर दिल्याची माहिती कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांनी केले.
ते चिपळूण पोलीस ठाण्यात स्वागत कक्षाच्या प्रारंभासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आपण जे जे काम करतो, त्या कामाची त्या माणसाला अधिक माहिती असते. त्याच्या व पोलिसांच्या संबंधांवर अधिक माहिती मिळत असते. सागरी सुरक्षा दलही आमच्या मदतीला आहे. त्यांच्यातर्फे बीट हवालदारांशी संपर्क येतो व माहिती मिळते, असे त्यांनी सांगितले.
सुरक्षेबाबत जाखडी नृत्याच्या माध्यमातून किनारपट्टी भागात प्रबोधनाचा प्रयोग झाला आहे. इतर तांत्रिक अडचणींबाबत शासन योग्य ती दखल घेत आहे. सततची गस्त व प्रत्येक जिल्ह्यासाठी बोटींना लावण्यात येणारा रंग यांचा विचार करून किनारपट्टी भागात झाडाझडती सुरू असते. किनारपट्टी भागात बसविलेले रडार बोटींचा रंग बघितल्यावर त्याची माहिती देते व त्यानंतर चौकशी सुरू होते. किनारपट्टी भागात चांगले काम सुरू आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील सागरी पोलीस ठाण्यात कोस्टल मार्शल बीट संकल्पना राबविली आहे. दोन रायफलधारी पोलीस कर्मचारी दुचाकीने गस्त घालीत असतात.
आरएफआयडीचा उपयोगही चांगल्या प्रकारे होत आहे.
मार्शल बीट तेथे पोहोचून स्पर्श केल्याशिवाय ते अॅक्टिव्हेट होत नाही. यामुळे रोज जावेच लागते.
सागरी सुरक्षेबाबत उपग्रहाद्वारे व प्रत्यक्ष लक्ष ठेवून आहोत; परंतु यासाठी किनारपट्टी भागातील तरुण, मच्छिमारांचे सहकार्य हवे.