कर्टेल येथे शिवस्वराज्यदिनी वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:39 IST2021-06-09T04:39:19+5:302021-06-09T04:39:19+5:30

खेड : तालुक्यातील कर्टेल गावात शिवस्वराज्य दिन विविध उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी वृक्षारोपण केले ...

Shivswarajyadini tree planting at Kurtel | कर्टेल येथे शिवस्वराज्यदिनी वृक्षारोपण

कर्टेल येथे शिवस्वराज्यदिनी वृक्षारोपण

खेड : तालुक्यातील कर्टेल गावात शिवस्वराज्य दिन विविध उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी वृक्षारोपण केले व ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात शिवसेना माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, सरपंच दिनेश चव्हाण, ॲड. दिलीप चव्हाण, श्रीकांत चव्हाण, मनोहर चव्हाण, राजेश पवार, गजानन कदम, अविनाश चव्हाण, ईश्वर चव्हाण, उमेश चव्हाण, राधिका जाधव, तुकाराम चव्हाण, नीलकंठ जाधव, रवींद्र जाधव, संतोष चव्हाण, तुळशीराम मोरे, श्रीकांत चव्हाण, सीताराम चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी ग्रामस्थांनी गावातील मोकळ्या जागेत व आपल्या घराच्या परिसरात वृक्षारोपण केले. यावेळी ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. तसेच कोरोना साथीचा प्रसार रोखण्यासाठी ज्यांना आजाराची लक्षणे असतील त्यांनी व त्यांच्या संपर्क आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तातडीने तपासणी करून घेण्याचे व उपचार करून घेण्याचे आवाहन माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी केले. कोरोना साथ रोखण्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला.

--------

खेड तालुक्यातील कर्टेल गावात शिवस्वराज्य दिनानिमित्त ग्रामस्थांनी वृक्षारोपण केले.

Web Title: Shivswarajyadini tree planting at Kurtel