रत्नागिरी जिल्ह्यात सहा पंचायत समित्या शिवसेनेकडे
By Admin | Updated: March 14, 2017 18:06 IST2017-03-14T18:06:36+5:302017-03-14T18:06:36+5:30
तीन ठिकाणी राष्ट्रवादी, चिपळुणात चिठ्ठीचा कौल राष्ट्रवादीला तर मंडणगडमध्ये शिवसेनेला

रत्नागिरी जिल्ह्यात सहा पंचायत समित्या शिवसेनेकडे
रत्नागिरी जिल्ह्यात सहा पंचायत समित्या शिवसेनेकडे
तीन ठिकाणी राष्ट्रवादी, चिपळुणात चिठ्ठीचा कौल राष्ट्रवादीला तर मंडणगडमध्ये शिवसेनेला
आॅनलाईन लोकमत
रत्नागिरी : जिल्ह्यातील नऊपैकी सहा पंचायत समिती शिवसेनेच्या तर तीन पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्या आहेत. यातील चिपळूण आणि मंडणगड या दोन पंचायत समितींमध्ये चिठ्ठी टाकून सभापती-उपसभापती निवड करण्यात आली. त्यात चिपळुणात राष्ट्रवादीला तर मंडणगडमध्ये शिवसेनेला कौल मिळाला.
एकतर्फी वर्चस्व मिळवले असल्याने राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर या चा ठिकाणी शिवसेनेचे सभापती, उपसभापती बिनविरोध निवडून आले. खेडमध्ये निवडणूक झाली आणि तेथेही शिवसेनेच प्राबल्य असल्यामुळे सभापती, उपसभापती शिवसेनेचाच झाला. दापोली आणि गुहागर पंचायत समितींवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवले असल्याने तेथे राष्ट्रवादीचे सभापती, उपसभापती झाले. चिपळूण आणि मंडणगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीचे बलाबल समान होते. त्यामुळे चिठ्ठी टाकून सभापती, उपसभापती निवड करण्यात आली. त्यात मध्यवर्ती आणि लक्षवेधी झालेली चिपळूण पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसलाल मिळाली. उपसभापती मात्र शिवसेनेचा झाला आहे. मंडणगड पंचायत समितीची दोन्ही पदे शिवसेनेला मिळाली. (प्रतिनिधी)
सभापती, उपसभापती निवडी पुढीलप्रमाणे...
मंडणगड (आदेश केणे, स्नेहल सकपाळ ), दापोली (चंद्रकांत बैकर, राजेश गुजर), खेड (भाग्यश्री बेलोसे, विजय कदम), चिपळूण (पूजा निकम,शरद शिगवण), गुहागर (विभावरी मुळे, पांडुरंग कापले), संगमेश्वर (सारिका जाधव, दिलीप सावंत), रत्नागिरी (मेघना पाष्टे,सुनील नावले), लांजा (दीपाली दळवी, युगंधरा हांदे), राजापूर (सुभाष गुरव, अश्विनी शिवणेकर )