शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

खासदार अवमान केल्याप्रकरणी शिवसेनेचा भाजपविरोधात प्रतिमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 18:34 IST

Shiv Sena Bjp Morcha ratnagiri- खासदार विनायक राऊत यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे व नीलेश राणे यांच्यावर टीका केल्यानंतर लांजा भाजपतर्फे खासदार विनायक राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने मोर्चा काढत खासदार यांचा अवमान केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देशिवसेनेचा भाजपविरोधात प्रतिमोर्चाखासदार अवमान केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल करा

लांजा : खासदार विनायक राऊत यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे व नीलेश राणे यांच्यावर टीका केल्यानंतर लांजा भाजपतर्फे खासदार विनायक राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने मोर्चा काढत खासदार यांचा अवमान केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी केली आहे.सिंधुदुर्ग येथील रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी रविवारी खासदार विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले होते.

या प्रकारानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी शिवसेना संपर्क कार्यालय ते तहसीलदार कार्यालय असा मोर्चा काढून आपल्या निषेध व्यक्त केला. या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, उपतालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख जया माने, सभापती लीला घडशी, उपसभापती दीपाली दळवी-साळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत मणचेकर, पंचायत समिती सदस्य संजय नवाथे, मानसी आंबेकर, नगरसेवक सोनाली गुरव, पूर्वा मुळे, शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, नगराध्यक्ष मनोहर बाईत, उपनगराध्यक्षा यामिनी जोईल, माजी नगराध्यक्ष सुनील कुरुप, दिलीप पळसुळे-देसाई, राहुल शिंदे आदींसह अनेक शिवसैनिक उपस्थित होतेकारवाई कराचमनाई आदेश असताना भाजप कार्यकर्त्यांनी जमाव गोळा करून खासदारांना अवमानकारक शब्द उच्चारुन त्यांचा पुतळा दहन केला. या प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, असे निवेदन तहसीलदार समाधान गायकवाड, पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMorchaमोर्चाBJPभाजपाRatnagiriरत्नागिरी