शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

..तर रिफायनरीबाबत शिवसेना सकारात्मक, मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 14:02 IST

राजापूर येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेने विरोधी भूमिका घेत कडाडून विरोध केला आहे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलनेही केली आहेत. येथील काही स्थानिकांच्या विरोधामुळे शिवसेनाही विरोधी भूमिकेत राहिली आहे.

रत्नागिरी : स्थानिक लोकांच्या मागणीवर शिवसेना अवलंबून आहे. स्थानिकांनी प्रकल्पाचे समर्थन केले तर त्याठिकाणी रिफायनरी होण्याबाबत शिवसेना सकारात्मक भूमिका घेईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना उदय सामंत यांनी रिफायनरीला समर्थन दिल्याचे वक्तव्य केल्याने रिफायनरीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राजापूर येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेने विरोधी भूमिका घेत कडाडून विरोध केला आहे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलनेही केली आहेत. येथील काही स्थानिकांच्या विरोधामुळे शिवसेनाही विरोधी भूमिकेत राहिली आहे.मात्र, या भागातील ग्रामस्थांनी रिफायनरीला पाठिंबा देत रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. ग्रामस्थांच्या या भूमिकेमुळे शिवसेनाही आता एक पाऊल मागे आली आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रिफायनरी प्रकल्प विदर्भात हलवावा, असे वक्तव्य केले आहे.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत गुरुवारी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत रिफायनरीबाबत सकारात्मक भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, स्थानिकांच्या मागणीवर शिवसेना अवलंबून असल्याचे वारंवार आम्ही सांगितले आहे.स्थानिकांनी प्रकल्पाचे समर्थन केल्यास रिफायनरी होण्याबाबत शिवसेना सकारात्मक भूमिका घेईल. रिफायनरीबाबत लोकांमधील गैरसमज दूर केले पाहिजेत. जे नकारात्मक आहेत, त्यांना सकारात्मक केले पाहिजे. चांगली पॅकेजीस दिली पाहिजेत, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.रिफायनरीबाबत शिवसेनेने युटर्न घेतला आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मंत्री उदय सामंत म्हणाले की, यात युटर्न कसला? आम्ही सुरुवातीपासून लोकांसोबत राहिलो आहोत. लोकांनी जर प्रकल्पाचे समर्थन केले तर शिवसेना लोकांच्या मागणीचा आदर करेल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतRajapurराजापुरShiv Senaशिवसेना