शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Shivsena: राजकीय वर्चस्वाच्या लढाईत निवडणुकांआधीच शिमगा, शाब्दिक युद्ध अजून किती काळ चालणार?

By मनोज मुळ्ये | Updated: September 23, 2022 15:57 IST

शाब्दिक युद्ध अजून काही काळ चालणार

मनोज मुळ्येरत्नागिरी : स्वतंत्र चूल मांडल्याने शिंदे गटाला आणि अनेकांनी जय महाराष्ट्र म्हटल्यामुळे शिवसेनेला आपल्या राजकीय वर्चस्वासाठी मोठी लढाई लढावी लागणार आहे. त्यामुळेच या दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. अर्थातच यात जिल्ह्याचा विकास, रखडलेला रिफायनरी प्रकल्प, पाटबंधारे खात्याच्या प्रकल्पांसाठीचा निधी अशा कोणत्याही विषयांपेक्षा राजकीय कुरघोड्याच अधिक आहेत.शिवसेनेतून बाहेर पडून शिंदे गट स्वतंत्र झाला आहे. आपण उचललेले पाऊल योग्य आहे आणि अधिकाधिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, हे दाखविणे शिंदे गटासाठी आवश्यक झाले आहे. शिवसेनेत कमी लोक राहिले आहेत आणि आपल्यासाेबत अधिक लोक आहेत, हे दाखविण्यासाठी शिंदे गटाला सतत कार्यरत राहावे लागणार आहे. हीच बाब शिवसेनेचीही आहे. अनेकांनी पक्ष सोडला. आता आणखी फाटाफूट होऊ नये यासाठी तसेच शिंदे गटाने पक्ष सोडून चूक केली आहे हे उरलेल्या कार्यकर्त्यांना दाखविण्यासाठी शिवसेनेलाही सतत कार्यरत राहावे लागणार आहे. कामाच्यादृष्टीने आणि शाब्दिक पातळीवर दोन्ही बाजूंना आक्रमकता ठेवावी लागणार आहे. त्याचेच प्रत्यंतर सध्या येत आहे.जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय शिमग्याला सुरुवात झाली ती युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे. त्यांच्या या दौऱ्यात त्यांची भाषणे गाजण्यापेक्षा स्थानिक नेत्यांची भाषणेच अधिक गाजत आहेत.रत्नागिरीत मंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेला मोठा धक्का दिल्यामुळे साहजिकच ठाकरे यांची पहिली सभा रत्नागिरीत झाली. या सभेत शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी मंत्री सामंत यांच्यावर हल्लाबोल केला. अगदी राष्ट्रवादी सोडतानाचे संदर्भ देत त्यांनी सामंत यांच्यावर टीका केली. रत्नागिरीतही आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा आमदार जाधव यांच्याच भाषणाची चर्चा अधिक होती.बालेकिल्ला कोणाचा?साधारणपणे १९९५ सालापासून रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. २५ वर्षे जिल्हा परिषद शिवसेनेच्या ताब्यात आहे. अनेक पंचायत समित्यांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. आता पाचपैकी तब्बल तीन विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचा जोर वाढत असल्याने पुढच्या वेळी सत्ता कोणाच्या ताब्यात जाणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यासाठीच ही वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे.

शिवसेनेला बंडाचा फटका मोठायाआधीही शिवसेनेत बंड झाली आहेत. पण शिवसेनेचे काहीही बिघडलेले नाही, असा दावा शिवसेना करत असली तरी याआधीची बंड आणि आताचे बंड यात फरक आहे. याआधीची बंड एक एका व्यक्तीने केली होती. मात्र यावेळी खूप मोठ्या संख्येने फूट पडली आहे. त्यातच केवळ आमदारच नाही तर अगदी तळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत फुटीचे लोण पसरले आहे.

पुतळा जाळपोळ यासाठीचशिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या विधानावरुन शिवसेनेने त्यांचे पुतळे जाळण्यास सुरुवात केली आहे. त्यावरुन दापोलीत दोन्ही गटांमध्ये राडा झाला. या साऱ्यामागे जिल्ह्यावर वर्चस्व ठेवणे हाच हेतू आहे की काय, अशी शंका येत आहे. नजीकच्या काळात आणखी काही प्रवेश होणार असल्याने शिंदे गट आणि शिवसेनेतील हे वाद वाढण्याचीच भीती आहे.

कदम-जाधव युद्धराजकीय वर्चस्वाच्या लढाईतूनच भास्कर जाधव आणि रामदास कदम या दोन बड्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्धच सुरू झाले आहे. २०१९ला शिवसेना सत्तेत येऊनही कोणतेही पद न मिळालेले आणि काहीसे शांत असलेले भास्कर जाधव आता अधिकच आक्रमक झाले असल्याचे दिसत आहेत.

  • शिंदे गट स्थापन झाल्यापासून भास्कर जाधव यांच्या भाषणांना अधिकच धार आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौर्यात तर त्यांनी कधी नव्हे इतके आक्रमक भाषण केले. दापोली त्यांनी रामदास कदम यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे जोरदार राळ उडाली आहे.
  • भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर आरोप केल्यानंतर रामदास कदम यांनी दापोलीत येऊन त्यांना जोरदार उत्तर दिले आहे. त्याला भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे हे शाब्दिक युद्ध अजून काही काळ चालणार असल्याचे दिसत आहे.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे