शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

दापोलीत शिवसेनेला जोरदार धक्का, आ. योगेश कदमांचे कट्टर समर्थक ठाकरे गटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 09:30 IST

खेड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाने खेळ गोळीबार मैदान येथे जाहीर सभा ठेवली आहे. सभेच्या पूर्वसंध्येला शिंदे गटाला ठाकरे धक्का दिला.

शिवाजी गोरे 

दापोलीत शिवसेनेला जोरदार धक्का बसला असून आमदार योगेश कदम यांचे कट्टर समर्थक दापोली नगपंचायत माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुसाळकर यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेने खेळ गोळीबार मैदान येथे जाहीर सभा ठेवली आहे. सभेच्या पूर्वसंध्येलाच शिवसेनेला हा मोठा झटका मानला जातोय.

दापोली नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत पुसाळकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह माजी आमदार संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांनी माजी आमदार संजयराव कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून तसेच शिंदे गटाकडून सतत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परिवारावर खालच्या थरावर टीका होत असल्याने त्याचा तीव्र शब्दात निषेध करत प्रवेश करत असल्याचे सांगितले.

या प्रसंगी माजी आमदार सुर्यकांत दळवी, दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर देसाई,तालुकाप्रमुख रूषीकेश गुजर, मा.बाधकाम सभापती विश्वास उर्फ काका कदम, नरेंद्र करमरकर, शहरप्रमुख संदीप चव्हाण, दापोली नगरपंचायत नगराध्यक्षा ममताताई मोरे, नगरसेविका नौसीन गिलगिले, नगरसेवक रविंद्र शिरसागर, नगरसेवक अझीम चिपळूणकर, युवासेना शहर अधिकारी प्रसाद दरीपकर, बिपिन मोरे, उमेश शिंदे, जिल्हा युवती समन्वयक भाग्यश्री चव्हाण, युवासेना सचिव साई मोरे, समन्वयक सायली गावडे, मंगेश गावडे, सुनिल साळवी, दत्ता भिलारे, अक्षय पाटणे तसेच ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह महिला आघाडी युवसेना कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे