शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
2
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
3
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
4
पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम
5
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
6
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
7
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
8
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
9
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
10
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
11
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
12
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
13
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
14
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
15
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
16
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
17
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
18
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
19
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
20
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय

Maharashtra Vidhan Sabha 2019: जिल्ह्यात शिवसेना-भाजपच्या मनोमीलनासाठी मातोश्रीवरून फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 13:58 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप - शिवेसनेचे पाचही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी करण्याकरिता रणनीती व रुसवे-फुगवे काढून साऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रचारात उतरावे, याकरिता शनिवार, दिनांक ५ आॅक्टोबरला सायंकाळी कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक रत्नागिरीत होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या मोबाईलवरील संभाषणानंतर या बैठकीचा निर्णय झाला.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना - भाजपच्या मनोमीलनासाठी मातोश्रीवरून फोनजिल्हाध्यक्षांशी चर्चा, भाजप-शिवसेना कोअर कमिटीची आज बैठक

रत्नागिरी : जिल्ह्यातील भाजप - शिवेसनेचे पाचही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी करण्याकरिता रणनीती व रुसवे-फुगवे काढून साऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रचारात उतरावे, याकरिता शनिवार, दिनांक ५ आॅक्टोबरला सायंकाळी कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक रत्नागिरीत होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या मोबाईलवरील संभाषणानंतर या बैठकीचा निर्णय झाला.विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये रुसवे फुगव्यांचे वातावरण आहे. काही जणांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे ते बंडखोरी करण्याच्या प्रयत्नात होते, तर काही जण प्रचारात सहभागी होणार नाहीत, असे चित्र होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भाजपच्या तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व जिल्हा कमिटी यांच्यासोबत समन्वय राखला गेला पाहिजे. याकरिता प्रत्येक मतदारसंघात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश असलेली कोअर कमिटी स्थापन करण्याची सूचना अ‍ॅड. पटवर्धन यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. ठाकरे यांनी या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत त्या दृष्टीने लक्ष घालण्याचे आश्वासन पटवर्धन यांना दिले. त्यामुळे पुढील दोन आठवडे प्रचारात दोन्ही पक्षांमध्ये सुयोग्य समन्वय राखला जाण्याची शक्यता आहे.राज्यात भाजप - शिवसेना महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन करायचे आहे. त्यामुळेच काही जागांवर शिवसेनेने व रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने माघार घेतली आहे. शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी होण्याकरिता भाजपची साथ आवश्यक आहे. यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्यात संभाषण झाले, असे थेट बोलणे झालेले अ‍ॅड. पटवर्धन हे भाजपचे पहिले जिल्हाध्यक्ष ठरले.

पूर्वीच्या युतीच्या फॉर्म्युल्यानुसार भाजपला रत्नागिरी व गुहागरची जागा मिळत होती. या दोन्ही जागांवर यशही मिळत होते. रायगड, पुण्यातील सर्व जागांवर भाजप निवडणूक लढवत आहे. त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व जागा शिवसेना लढवत असल्याचे सांगण्यात आले.नेते, उमेदवार बैठकीतरत्नागिरीत आयोजित केलेल्या या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे. या बैठकीमध्ये भाजपचे जिल्हास्तरावरील महत्त्वाचे दहा पदाधिकारी आणि शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत, भास्कर जाधव, सदानंद चव्हाण, योगेश कदम आणि राजन साळवी हे बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरी