शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जे गेले त्यांचे बाेलवते धनी दिल्लीतील पातशहा आहेत, खासदार विनायक राऊतांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 19:08 IST

शिवसेनेचे भगवे तेज तेवढ्याच ताकदीने उभे राहील

रत्नागिरी :  उद्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अजेंड्यावर अजूनही आपली तारीख नाही. शिवसेनेचे धनुष्य पळवणारे अजूनही जन्माला आलेले नाहीत. शिवसेनेचे भगवे तेज तेवढ्याच ताकदीने उभे राहील. गेले त्यांचे बोलावते धनी दिल्लीतील पातशहा आहेत, अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली.रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात रविवारी शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री रवींद्र माने, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, प्रदीप बोरकर, सहजिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.एका माणसाला मी शोधतोय, राजन साळवींचा सत्कार करायला येणार होता. गद्दारांच्या शब्दावर विश्वास ठेवू नका. पक्ष साेडून गेलेले आता आम्ही शिवसेनेचे असे सांगायला लागले आहेत. अशी टिकाही खासदार राऊत यांनी केली. यापुढे कोणत्याही गद्दराला शिवसेनेत प्रवेश नाही असे जाहीर केले.रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना लक्ष्य करत ते म्हणाले की, शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर आरोप करून गेले तरी ते म्हणताहेत आम्ही शिवसैनिक.आपले पणाच्या भावनेने तुम्हाला जवळ केले. मातोश्रीवर स्वतःच्या हाताने बनवलेले अन्न घातलेे. म्हाडाचे पद दिले, मंत्री केले. आदित्य ठाकरे यांनी फक्त उदय सामंत यांच्यावर विश्वास ठेवला आणि अख्खा महाराष्ट्र त्यांच्यासह फिरले. मातोश्रीच्या अन्नाची पण किंमत का नाही ठेवली. ज्या शिवसेनेने राजकीय अस्तित्व दिले, त्याच शिवसेनेला संपवायची भाषा हे करत आहेत. अशी अनेक बंड आम्ही पाहिली आहेत. हिंमत असेल तर राजीनामा द्या, असे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, ज्यावेळी उध्दव ठाकरेंना आधारची गरज होती, त्यावेळी हे पळून गेले. कोणत्या अधिकारात राजन साळवींच्या सत्काराला यायची वक्तव कराल, असेही खासदार विनायक राऊत यांनी ठणकावले.

आमदारकी बाळासाहेबांच्या चरणी : राजन साळवीउदय सामंत २०१४ मध्ये शिवसेनेत आले. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे डोक्यात ठेवूनच शिवसेनेचा एक आमदार म्हणून सामंत आमदार झाले. पुढे ते म्हाडा अध्यक्ष, उपनेते आणि कॅबिनेट मंत्रीही झाले. यावेळी माझ्यावर अन्याय झाला, पण निष्ठा शिवसेनेशी आहे. आता आमदारकी गेली तरी चिंता नाही, ती बाळासाहेबांच्या चरणाशी अर्पण करतो, असे आमदार राजन साळवी म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाVinayak Rautविनायक राऊत