गवाणे गटामध्ये शिवसंपर्क अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:38 IST2021-09-10T04:38:23+5:302021-09-10T04:38:23+5:30
लांजा : तालुक्यातील गवाणे जिल्हा परिषद गटात शिवसेनेतर्फे शिवसंपर्क अभियान पार पडले. खानवली येथे ...

गवाणे गटामध्ये शिवसंपर्क अभियान
लांजा : तालुक्यातील गवाणे जिल्हा परिषद गटात शिवसेनेतर्फे शिवसंपर्क अभियान पार पडले. खानवली येथे पार पडलेल्या या अभियानात पक्ष वाढीबाबतही चर्चा करण्यात आली.
शिवसेना संपर्क अभियानाला जिल्हाप्रमुख विलास चाळके, आमदार राजन साळवी, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुका प्रमुख संदीप दळवी, शिक्षण अर्थ सभापती चंद्रकांत मणचेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष स्वरूपा साळवी, लांजा पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, उपसभापती दीपाली दळवी उपस्थित होते.
लोकांशी संपर्क वाढविणे तसेच गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक या माध्यमातून महाविकास आघाडीचे सरकारचे काम व धोरण जनतेपर्यंत पोहोचविणे हा मुख्य उद्देश या संपर्क अभियानाच्या माध्यमातून साधण्यात आला.
हे संपर्क अभियान यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता उपतालुकाप्रमुख सुरेश गरमळे, विभाग प्रमुख प्रदीप गार्डी, रूपेश सुर्वे, संजय नवाथे, सुधीर तेंडुलकर, नीलेश खानविलकर, रूपेश रेवाळे व या पंचायत समिती गणातील सर्व शाखा प्रमुख, महिला आघाडी प्रमुख, युवा सेना कार्यकर्ते, सहकार संघटना, वाहतूक सेना व आजी-माजी लोकप्रतिनिधींनी मेहनत घेतली.