शिमग्याआधीच कोकणात सोंग नाचायला लागली; विनायक राऊत यांचा निलेश राणे यांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 22:30 IST2019-03-03T22:30:25+5:302019-03-03T22:30:31+5:30

रत्नागिरी : आता शिमगा जवळ आला आहे, पण शिमग्याआधीच कोकणात सोंग नाचायला लागली आहेत. मिसरूड न फुटलेल्याने बाळासाहेबांवर केलेली ...

Before Shimga, he started to dance in Konkan; Vinayak Raut's Nilesh Rane collapsed | शिमग्याआधीच कोकणात सोंग नाचायला लागली; विनायक राऊत यांचा निलेश राणे यांना टोला

शिमग्याआधीच कोकणात सोंग नाचायला लागली; विनायक राऊत यांचा निलेश राणे यांना टोला

रत्नागिरी : आता शिमगा जवळ आला आहे, पण शिमग्याआधीच कोकणात सोंग नाचायला लागली आहेत. मिसरूड न फुटलेल्याने बाळासाहेबांवर केलेली टीका शिवसैनिक सहन करणार नाहीत. शरद पवार, नारायण राणे यांनी टीका केली तर समजू शकतो, पण राजकारणामध्ये ज्यांना शिवसेनेने जन्माला घातले, त्यांच्यावरच आरोप केले जात आहेत. शिवसैनिक लेचापेचा नसून यावेळी डिपॉझिट जप्त करूनच नीलेश राणेला पराभूत करून घरी पाठवणार, असा विश्वास शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.
रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी जिल्हा परिषद गटाच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार राऊत म्हणाले की, वाटदमधील शिवसैनिकांनी मेळावा घेऊन चौकार मारला होता, तर तुम्ही आज षटकार मारल्याचे सांगितले. आपल्या मुलांमुळे नारायण राणे कंटाळे आहेत, अस्वस्थ आहेत. त्यांच्या तब्बेतीला आराम पडो, असे सांगून या दोन पोरांना घरी बसवा म्हणजे त्यांच्या तब्बेतीला आराम पडेल, असा टोलाही त्यांनी हाणला.

Web Title: Before Shimga, he started to dance in Konkan; Vinayak Raut's Nilesh Rane collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.