शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

सागरी किनारी सुरक्षेचा विचार घेऊन निघाली ‘शीड नौका परिक्रमा’; उद्या रत्नागिरीतील मांडवी येथे येणार

By मनोज मुळ्ये | Updated: December 29, 2023 18:37 IST

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांचा सागरी किनारी सुरक्षेचा विचार किनारपट्टीवर पोहोचवण्यासाठी सागरी सीमा मंचने सागरी शीड नौका परिक्रमा आयोजित ...

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांचा सागरी किनारी सुरक्षेचा विचार किनारपट्टीवर पोहोचवण्यासाठी सागरी सीमा मंचने सागरी शीड नौका परिक्रमा आयोजित केली आहे. शिडाच्या नौकेने मुंबई ते विजयदुर्ग हा सागरी प्रवास होणार असून, ही नौका परिक्रमा शनिवारी (३० डिसेंबर) सायंकाळी ४ वाजता रत्नागिरीतील मांडवी येथे येणार आहे.

या परिक्रमेमध्ये ३० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. परिक्रमेदरम्यान चार ठिकाणी सागरी सुरक्षा व सागरी पर्यावरणाचे जागरण केले जाणार आहे. सागरी सीमा मंच व शिवशंभू विचार मंच या दोन संस्थांद्वारे शिडाच्या नौकेने ‘गेट वे ऑफ इंडिया’ ते विजयदुर्ग अशी परिक्रमा करण्यात येणार आहे. या परिक्रमेसाठी भारतीय तटरक्षक दल, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, सीमा शुल्क, सागरी पोलिस, मत्स्य विभाग यांचे सहकार्य मिळाले आहे. कुलाबा, मच्छीमारनगर येथे सागरी परिक्रमेचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांताचे कार्यवाह विठ्ठल कांबळे आणि शिवशंभू विचारमंचचे प्रांत संयोजक अभय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

विजयदुर्गात १ राेजी समाराेपसागरी परिक्रमेदरम्यान खांदेरी किल्ला, कुलाबा किल्ला, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग, रत्नदुर्ग आणि विजयदुर्ग या किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम, किल्लापूजन, किल्लादर्शन करण्यात येणार आहे. अलिबाग, बुरोंडी (ता. दापोली), रत्नागिरी या ठिकाणी जाहीर कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. १ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता सागरी परिक्रमेचा समारोप विजयदुर्ग येथे होणार आहे. यावेळी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज व रायगड स्मारक समितीचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे आणि सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक ऋषीकेश रवाळे उपस्थित राहणार आहेत.

सागरी सीमांच्या सुरक्षांचे महत्त्व जाणून छत्रपती शिवाजी महाराजांनी किनारपट्टीवरील रहिवाशांना सोबत घेऊन आरमार उभे केले. त्यातून सरखेल कान्होजी आंग्रे, मायनाक भंडारी, हिरोजी यांच्यासारखे लढवय्ये घडले. आजही सागरी सीमांच्या सुरक्षेचे महत्त्व तितकेच आहे. परिक्रमेदरम्यान सागरी सुरक्षा आणि प्लास्टिक प्रदूषण राेखण्याबाबत जागृती केली जात आहे. - केतन अंभिरे, प्रांत संयोजक, सागरी सीमा मंच

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्ग