शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

महाविकास आघाडीची ३० सप्टेंबर, १ ऑक्टोबरला जागा वाटपासाठी बैठक, शरद पवार यांनी दिली माहिती

By संदीप बांद्रे | Updated: September 23, 2024 16:45 IST

जर का कोणी उमेदवारीचा आताच दावा करत असेल, तर..

चिपळूण : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात महत्वाची बैठक ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तेव्हा घटक पक्षातील कोणी विधानसभेच्या कुठल्याही जागेवर दावा केला, तरी याचा अंतिम निर्णय हा तिन्ही पक्षांच्या एकत्रित होणाऱ्या बैठकीनंतरच जाहीर केला जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील स्वा. सावरकर मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेआधी पवार यांनी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले,  उमेदवारीची इच्छा असणे स्वाभाविक आहे. परंतु हा निर्णय एका पक्षाचा राहिलेला नाही. तो महाविकास आघाडीचा निर्णय असून तो एकत्रित घेतला जाणार आहे. त्यामुळे यासंदर्भातील आता होणारे दावे निरर्थक आहेत. जर का कोणी उमेदवारीचा आताच दावा करत असेल, तर त्यांच्या बाबतीत 'बाजार तुरी आणि कोण कोणाला मारी', असेच त्यांच्या बाबतीत म्हणावे लागेल, असे स्पष्ट केले. मुंबई-गोवा महामार्गाबाबत नाराजी, सत्ता आल्यास भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढूकोकणातील प्रमुख मार्ग असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाबाबत खासदार पवार यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. १४ वर्षे होऊनही हा प्रकल्प पूर्ण होत नसेल, तर ते सरकारचे मोठे अपयश आहे. यामध्ये निश्चित भ्रष्टाचार झालेला आहे. या कामाविषयी जेवढ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत, तेच या कामाच्या निकृष्ट दर्जाचा दाखला आहे. तेव्हा या रस्त्याच्या कामाबद्दल लोकं जर तक्रारी करत असतील, तर ते अजिबात चुकीचे नाही. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास या कामातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढू, असा इशाराच खासदार पवार यांनी दिला.मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाला शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. जरांगे यांची मागणी योग्य असल्याने आरक्षणाला पाठिंबा आहे. त्याशिवाय इतर छोट्या छोट्या समाजाचाही विचार व्हावा व त्यांना आरक्षणा मध्ये सामावून घेण्यात यावे, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.उभ्या आयुष्यात असा रस्ता पाहिला नाही!चिपळुणातील जाहीर सभेसाठी खासदार शरद पवार हे कराड मार्गे कुंभार्ली घाटाने आले. या रस्त्यावर पाठण, हेळवाक दरम्यान पडलेल्या खड्ड्यांविषयी बोलताना खासदार पवार यांनी उभ्या आयुष्यात असा रस्ता मी पाहिला नाही, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली. एका वर्षात तीन वेळा या रस्त्याची दुरुस्ती केली म्हणे, राज्यात महायुतीचा हा असाच कारभार सुरू राहिला, तर एक दिवस देश खातील, अशीही खंत व्यक्त केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSharad Pawarशरद पवारMaratha Reservationमराठा आरक्षणhighwayमहामार्ग