अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; संशयित पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST2021-06-30T04:20:43+5:302021-06-30T04:20:43+5:30
मंडणगड : तालुक्यातील माहू गावातील नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही ...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; संशयित पोलिसांच्या ताब्यात
मंडणगड : तालुक्यातील माहू गावातील नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना २७ जून राेजी सायंकाळी ४ ते ४.१५ वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी पाेलिसांनी आशिष विजय बाईत (१९, रा. माहू, ता. मंडणगड) याला ताब्यात घेतले आहे.
यासंदर्भात पीडित बालिकेच्या आईने मंडणगड पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २७ जून २०२१ रोजी दुपारी आशिष याने नऊ वर्षांच्या मुलीला घरात कुणी नसताना पाठ दाबण्याच्या बहाण्याने बोलावले. घराचा दरवाजा बंद करुन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले आहे. बालिकेच्या आईने नोंदविलेल्या फिर्यादीनंतर मंडणगड पोलीस स्थानकात विरोधात आशिष याच्याविराेधात भारतीय दंड विधान कलम ३७६, ३७६ अ व ब, बाल लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ चे कलम ४,६, ८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आशिष याला २९ जून २०२१ रोजी खेड येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुशांत वराळे करीत आहेत.