शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पोक्सोअंतर्गत गुन्हा, विवाहित तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 17:27 IST

खेड तालुक्यातील सोनगाव येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी त्याच गावातील रोशन खेराडे या तरुणाला बलात्कार आणि पोक्सोअंतर्गत अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पोक्सोअंतर्गत गुन्हा, विवाहित तरुणाला अटक

खेड : तालुक्यातील सोनगाव येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी त्याच गावातील रोशन खेराडे या तरुणाला बलात्कार आणि पोक्सोअंतर्गत अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.ही घटना मंगळवार, दिनांक १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. रोशन खेराडे हा पीडित अल्पवयीन मुलीच्या वाडीत राहतो. तो विवाहित असून, त्याची पत्नी गर्भवती आहे. मंगळवारी पीडित मुलगी घरात एकटी होती. ती शेजारच्या काकूंकडे गेली होती. असताना रोशन तिच्या घरात शिरून लपून बसला होता.

थोड्यावेळाने ती परत आल्यावर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि कोणालाही न सांगण्याची धमकीही दिली. संध्याकाळी त्या मुलीचे पालक घरी आल्यानंतर तिने घडलेली सर्व हकीकत आई - वडिलांना सांगितली. त्यानंतर पीडित मुलीचे पालक आणि तिच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर खेड पोलिसांनी रोशन खेराडे याला ताब्यात घेतले.पीडित मुलीच्या तक्रारीनुसार खेराडे याच्यावर भादंवि कलम ३७६, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. गेल्याच आठवड्यात खेडमधील खोपी गावात अशाच प्रकारे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आठवडाभरातील ही दुसरी घटना असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी