शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

रत्नागिरीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 12:52 IST

sex racket Ratnagiri- रत्नागिरी शहरातील ओसवालनगर येथे एका बंगल्यात सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्याचा पर्दाफाश केल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक पीडित युवतीही पोलिसांना सापडली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाशस्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई, दोघेजण ताब्यात

रत्नागिरी : शहरातील ओसवालनगर येथे एका बंगल्यात सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्याचा पर्दाफाश केल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक पीडित युवतीही पोलिसांना सापडली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी त्यांना जागा शोधून देणाऱ्या एका ड्रायव्हरलाही ताब्यात घेतले आहे.परजिल्ह्यांतून मुली आणून त्यांचा वापर हे सेक्स रॅकेट चालविणारे करीत होते. या ठिकाणी शहर परिसरातील अनेक उच्चभ्रू वस्तीतील लोकांची वर्दळ या बंगल्यामध्ये सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर हा छापा टाकण्यात आला.

शहरामध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने हे रॅकेट उद्‌ध्वस्त करण्याची आखणी केली. त्याप्रमाणे बनावट गिऱ्हाईक तयार करून भेटीची वेळ ठरविण्यात आल्याप्रमाणे गुरुवारी दुपारी सापळा रचून गुन्हा अन्वेषण शाखेने ओसवालनगरमधील त्या बंगल्यात छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.

पोलिसांनी छापा टाकताच हे रॅकेट चालविणाऱ्या त्या पुरुष आणि महिलेची धावपळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी त्या दोघांना तत्काळ ताब्यात घेतले.शहरातील रिकामे बंगले भाड्याने घेऊन देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची चर्चा गेले अनेक दिवस शहरात सुरू होती. त्यातच ओसवालनगरमधील देहविक्रीचे प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. यामध्ये अन्य काहीजण असण्याची शक्यता असून पोलीस तपासानंतर पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेली महिला व तिच्यासोबतच्या पुरुषावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांकडून सुरू होती. ज्यावेळी हा छापा टाकण्यात आला, तेव्हा तेथे एक पीडित युवतीही पोलिसांना सापडली आहे.पती-पत्नी म्हणून एकत्रज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, ते दोघेजण पती-पत्नी म्हणून वावरत होते. ते खरोखरच पती-पत्नी आहेत की तोही खोटेपणा आहे, याचा तपासही घेतला जात असल्याचे समजते.अनेकांची नावे येणार समोरपोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास सुरू केला आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांच्या कॉल रेकॉर्डसची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांनी कोणाकोणाशी संपर्क साधला होता हे समोर येणार आहे. या प्रकरणात बड्या बड्या लोकांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिस