शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'ईडीचा तपास सोम्या गोम्याना समजतोच कसा?'; दिपक केसरकर यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 21:18 IST

दीपक केसरकर यांनी गुरूवारी सावंतवाडी येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी राणेच्या आरोपांचा समाचार घेतला.

सावंतवाडी: केंद्रीय मंत्री नारायण राणे हे जर मातोश्रीवरील चार जणांना ईडी लवकरच नोटीस बजावणार असे सांगत असतील, तर हा तपास यंत्रणेचा अपमान असून देशातील सर्वाच्च संस्थाचा तपास सोम्या गोम्याना समजतोच कसा, असा सवाल शिवसेना आमदार दिपक केसरकर यांनी केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सुशांत सिंग प्रकरणाची फाईल पुन्हा उघडेल सांगायला राणे काय केंद्रीय गृहमंत्री आहेत का असा सवाल ही त्यांनी यावेळी केला. केसरकर यांनी गुरूवारी सावंतवाडी येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी राणेच्या आरोपांचा समाचार घेतला.

सध्या महाराष्ट्रात कोणीही उठते आणि राज्य सरकारवर बोलतो जिकडे तिकडे ईडीची भिती घातली जाते हे योग्य नाही तुम्ही जेवढे महाविकास आघाडी तील नेत्यांना त्रास देणार तेवढे हे सरकार आणि पेटून उठेल. ईडी वैगरे या तपास यंत्रणा देशातील सर्वाच्च आहेत त्याचा गैरवापर होत असून सामान्य माणूस पण हे जाणून आहे त्यामुळे प्रत्येकाने ओळखले पाहिजे लोकशाहीत जनता महत्वाची असून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना ही पराभूत व्हावे लागले होते.असेही आमदार केसरकर यावेळी म्हणाले.

राणे यांनी मातोश्री वरच्या चौघांना लवकरच ईडी  नोटीस बजावेल असे म्हटले आहे यावरही केसरकर यांनी भाजप ला सल्ला दिला भाजपचे विचार आम्हाला समविचारी वाटायचे पण पण राणे सारखे नेते पक्षात घेऊन भाजप वेगळ्याच दिशेला वाहत जाऊ लागला आहे जेथे राणे तेथील सत्ता जाते हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही लक्षात ठेवावे राणेंना सुधारण्याची संधी होती पण ते सुधारू शकत नाही संजय राऊत यांनी राणेवर आरोप केले नव्हते तरीही ते पुढे का आले असा सवाल ही केसरकर यांनी यावेळी करत सोम्या गोम्याना ईडी च्या कारवाया समजत असतील तर तपास यंत्रणेचे महत्व कुठे राहणार असा सवाल ही उपस्थीत केला.

सुशांत सिग राजपूत व दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार असे राणे यांनी सांगायला ते काय केंद्रीय गृहमंत्री आहेत का? आणि सीबीआय ने अद्याप पर्यंत या तपासाची फाईल बंद केली नाही मग आणि कशी उघडणार काय फक्त बदनामीचा प्रकार सुरू आहे.या देशात अद्याप उच्च व सर्वाच्च न्यायालये आहेत एवढे लक्ष ठेवा जनता तुम्हाला कधी तरी जाब विचारेल त्यामुळेच उत्तर प्रदेश सारख्या राज्यात एक युवा नेतृत्व ही तुमची झोप उडवत असल्याचे केसरकर हे भाजप ला उद्देशून म्हणाले.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याDeepak Kesarkarदीपक केसरकर Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा