पंचनाम्याचा आढावा तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:28 IST2021-08-01T04:28:48+5:302021-08-01T04:28:48+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : अतिवृष्टीमुळे राजापूर तालुक्यात भातशेती तसेच पूल, रस्ते व घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील ...

पंचनाम्याचा आढावा तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवा
लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : अतिवृष्टीमुळे राजापूर तालुक्यात भातशेती तसेच पूल, रस्ते व घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील नुकसानभरपाई पंचनाम्यांचा आढावा तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवावा, असे आदेश आमदार राजन साळवी यांनी दिले. आमदार साळवी यांनी तहसीलदार कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी पूरपरिस्थितीची माहिती घेतली.
या बैठकीमध्ये आमदार राजन साळवी यांनी राजापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. नुकसानग्रस्तांना तत्काळ नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करा, अशी सूचना त्यांनी दिली. तसेच पालकमंत्री अनिल परब यांच्या बैठकीमध्ये जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करणार असल्याचे आमदार साळवी यांनी सांगितले.
या बैठकीला तहसीलदार प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी सागर पाटील, राजापूरचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, तालुका आरोग्य अधिकारी निखिल परांजपे, महिला व बालकल्याण सभापती भारती सरवणकर, सभापती उन्नती वाघरे, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आकाश मापके, जिल्हा परिषद बांधकामचे शाखा अभियंता पी. आर. उरणकर, आर. ए. पाटील, एस. वाय. भालेकर, महावितरणचे अनिल डोंगरे, तालुका कृषी अधिकारी व्ही. बी. पाटील, आरोग्यसेवक आर. ए. यादव, एस. व्ही. बंडगर, शहरप्रमुख संजय पवार, उपतालुकाप्रमुख राजन कुवळेकर, रामचंद्र उर्फ तात्या सरवणकर, नगर परिषद गटनेता विनय गुरव, विभागप्रमुख नरेश दुधवडकर, नामदेव मयेकर उपस्थित होते.
----------------------------
राजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा आमदार राजन साळवी यांनी घेतला. यावेळी तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित हाेते.