बॅँक निवडणुकीत सेनेने बांधली नाराजांची मोट

By Admin | Updated: April 10, 2015 00:27 IST2015-04-09T23:21:10+5:302015-04-10T00:27:22+5:30

सारे काही वर्चस्वासाठी : ‘सहकार’मधून पत्ता कट झालेल्या उमेदवारांना ‘शिवसंकल्प’मध्ये संधी

Sena built the bank's election | बॅँक निवडणुकीत सेनेने बांधली नाराजांची मोट

बॅँक निवडणुकीत सेनेने बांधली नाराजांची मोट

रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना या निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार उभे करताना शिवसेनेच्या शिवसंकल्प पॅनेलची मोठीच दमछाक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी सहकार पॅनेलने यावेळी उमेदवारी देताना ज्यांचा पत्ता कट केला, अशा असंतुष्टांची तसेच कॉँग्रेस राष्ट्रवादीतील नाराजांची आयात करत त्यांची मोट बांधून शिवसेनेने त्यांना शिवसंकल्प पॅनेलमधून उमेदवारी दिली आहे. गुहागरमधील भाजपाचे उमेदवार भालचंद्र बिर्जे यांच्याविरोधात लक्ष्मण शिगवण यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे सहकार पॅनेल व शिवसंकल्प पॅनेलमधील राजकीय फेरबदलाचा कोणाला फायदा होणार असा सवाल निर्माण झाला आहे.
शिवसंकल्प पॅनेलतर्फे जिल्हा बॅँक निवडणुकीत सर्व २१ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मात्र, त्यातील कुक्कुटपालन मतदारसंघातील सेना उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाल्याने शिवसेनेच्या उमेदवारांची संख्या २० झाली आहे. आता व्यक्तिगत अर्ज भरलेल्या उमेदवाराला शिवसेना पाठिंबा देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र कॉँग्रेस व राष्ट्रवादीतील काही असंतुष्टांना सेनेने उमेदवारी दिल्याने राजकीय समीकरणे कितपत बदलतील, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
शिवसंकल्प पॅनेलमधून दापोली विकास सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढविणारे सुधीर महादेव कालेकर व रत्नागिरीतून निवडणूक लढविणारे सेनेचे किरण सामंत हे दोनच उमेदवार निवडून येतील, असा होरा राजकीय वर्तुुळात आहे. यात संगमेश्वरमधून आणखी एक जागा सेनेला मिळू शकेल, असाही अंदाज व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात सेनेच्या नेत्यांकडून मात्र २१ पैकी ८ जागा जिंकणार असल्याचा दावा केला जात आहे. राजापूरमधून सहकार पॅनेलने संधी नाकारल्याने दिवाकर दयाळ मयेकर यांनी शिवसेनेच्या पॅनेलमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनाही या मतदारसंघातून विजयाची खात्री आहे. सहकार पॅनेलने उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेल्या दिवाकर मयेकर यांना शिवसेनेने संधी दिली. ३४ पैकी २४ मते आपल्याकडे असल्याने विजय निश्चित असल्याचा दावा मयेकर यांनी प्रसारमाध्यमांकडेही केला आहे. सहकार पॅनेलच्या विद्यमान संचालक असलेल्या विठाबाई विठोबा कदम यांना यावेळी सहकार पॅनेलने उमेदवारी नाकारली. गणेश यशवंत लाखण यांनाही सेनेने उमेदवारी दिली. ते सर्वच पक्षांशी सलोखा राखून असतात. त्यामुळे त्यांचा पक्ष कोणता हा वेगळा विषय ठरतो. मात्र त्यांना यावेळी सेनेने उमेदवारी दिली आहे. (प्रतिनिधी)+


लक्ष्मण शिगवण यांनी इतर मागास वर्ग मतदारसंघातील अमजद बोरकर यांच्याविरोधातही अर्ज दाखल केला आहे. आठ वर्षापूर्वी महिला राखीव मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. त्यामुळे नाराज झालेल्या कदम यांनी निवडणूकीत स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शशिकांत चव्हाण यांनी विकास मतदारसंघातून उमेदवारी दाखल करून बॅँकेचे विद्यमान उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांना शशिकांत चव्हाण यांनी आव्हान दिले आहे.

Web Title: Sena built the bank's election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.