निसर्ग सुर्वे याची एअर फोर्समध्ये निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:32 IST2021-04-24T04:32:08+5:302021-04-24T04:32:08+5:30
व्यापारी, बँक कर्मचाऱ्यांचे लसीकरण करा चिपळूण : पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना प्राधान्याने लस दिली जात आहे. त्याच पध्दतीने ...

निसर्ग सुर्वे याची एअर फोर्समध्ये निवड
व्यापारी, बँक कर्मचाऱ्यांचे लसीकरण करा
चिपळूण : पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना प्राधान्याने लस दिली जात आहे. त्याच पध्दतीने लॉकडाऊनमध्येही ज्या सेवा सुरू आहेत, उदाहरणार्थ बँक, अत्यावशक सेवेतील दुकानदार, भाजी व्यापारी, वाहतूकदार, पेट्रोल पंप कर्मचारी यांनाही प्राधान्याने लस दिली, तर चांगले होईल. कारण यांचा जास्त नागरिकांशी संबंध येत असतो. लॉकडाऊनमुळे ज्यांना घरीच बसावे लागत आहे, अशांना जर नंतर लस दिली तर योग्य होईल, अशी मागणी माजी नगरसेवक शिरीष काटकर यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
खेड नगरपरिषद दवाखान्याबाहेर पंख्याची व्यवस्था
खेड : नगरपरिषद दवाखान्यात नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. मात्र लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना दवाखान्याबाहेरील मंडपात उभे राहावे लागते. कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांना चांगलाच घाम फुटत आहे. या पार्श्वभूमीवर प्रसाद शेट यांनी दवाखान्याबाहेरील मंडपात स्वखर्चाने पंख्याची व्यवस्था केली आहे. नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
त्रैवार्षिक यात्रा रद्द
खेड : तालुक्यातील रसाळगड येथील श्री झोलाई वाघजाई देवीची ३० एप्रिल रोजी होणारी त्रैवार्षिक यात्रा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. यादिवशी फक्त श्री झोलाई वाघजाई देवीच्या पूजापाठाचा कार्यक्रम होणार असल्याचे रसाळगड दहागाव ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष विश्वास कदम यांनी सांगितले आहे.
पाणी पुरवठ्यासाठी दोन खासगी टँकर उपलब्ध
खेड : तालुक्यात दिवसागणिक टंचाईग्रस्त गावे, वाड्यांची संख्या वाढू लागली आहे. टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे एकामागोमाग अर्ज दाखल होत असल्याने प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे. टंचाईग्रस्त गावे, वाड्यांना एका शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असतानाच आणखी दोन खासगी टँकर उपलब्ध झाले आहेत. एक शासकीय व दोन खासगी टँकरद्वारे तालुक्यातील ६ गावे ८ वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये खवटी - खालची व वरची धनगरवाडी, आंबवली - भिंगारा, सवणस – मुळगाव, तुळशी - कुबजई, खोपी - रामजीवाडी, कशेडी – बंगला आदी गावे - वाड्यांचा समावेश आहे. सुकिवली चोरद नदीपात्रातून एक दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.