घरडा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:35 IST2021-08-24T04:35:19+5:302021-08-24T04:35:19+5:30
आवाशी : लवेल (ता. खेड) येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूमार्फत कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली आहे. डॉ. के. ...

घरडा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची निवड
आवाशी : लवेल (ता. खेड) येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूमार्फत कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली आहे.
डॉ. के. एच. घरडा यांनी ग्रामीण भागातील मुलांना अभियांत्रिकी शिक्षणाची सुवर्णसंधी प्राप्त व्हावी, या हेतूने २००७ मध्ये लवेल येथे घरडा अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले. यामध्ये केमिकल, मेकॅनिकल, काॅम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन व सिव्हिल या अभियांत्रिकीच्या शाखा सुरू केल्या. केवळ पदवी मिळवून देणे एवढेच उद्दिष्ट न ठेवता त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रा. संदीप मगदूम यांच्या नेतृत्वाखाली ट्रेनिंग व प्लेसमेंट हा विभाग सुरू आहे. त्याअंतर्गत सिव्हिल शाखेचे गुरुप्रसाद कोरगावकर, जयेश एकावडे, शिवम खातू, तर आयटी क्षेत्रातील विवेक विजय सकपाळ, पूर्वा संतोष सकपाळ, ओमश्री किशोर दळवी व इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन विभागाची रेवती रवींद्र पालांडे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. महाविद्यालयाच्या या यशासाठी व्यवस्थापन, प्राचार्य डॉ. प्रमोद जोशी, सर्व विभागप्रमुख, सर्व विभागाचे टीपीओ समन्वयक व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले आहे.