गुहागर आगारातून दररोज निवडक बसेस धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST2021-05-28T04:23:43+5:302021-05-28T04:23:43+5:30

असगोली : गुहागर आगारातून दरराेज निवडक बसेस साेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आगाराकडून नियाेजन करण्यात आले आहे़ ...

Selected buses will run daily from Guhagar depot | गुहागर आगारातून दररोज निवडक बसेस धावणार

गुहागर आगारातून दररोज निवडक बसेस धावणार

असगोली : गुहागर आगारातून दरराेज निवडक बसेस साेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आगाराकडून नियाेजन करण्यात आले आहे़ या नियाेजनानुसार चिपळूणकडे रोज नऊ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

गुहागरहून चिपळूणला रोज सकाळी ६, ७, ८, ९ वाजता आणि दुपारी १२, २, ४ व संध्याकाळी ५ व ६ वाजता गाड्या सोडण्यात येणार आहेत. तर चिपळूणहून गुहागरसाठी सकाळी ८, ९, १०, ११ वाजता आणि दुपारी २, ४ व संध्याकाळी ५, ६ तसेच रात्री ८.३० वाजता गाड्या सोडण्यात येतील.

गुहागरहून रत्नागिरीसाठी सकाळी ६.३० वाजता व्हाया चिपळूण तर सकाळी ८ वाजता व्हाया आबलोली गाडी सोडण्यात येणार आहे. रत्नागिरीवरून गुहागरला २.३० वाजता व्हाया आबलोली व ४.४५ वाजता व्हाया चिपळूण गाडी सोडण्यात येणार आहे. तसेच गुहागरवरून बोऱ्या व आबलोली मार्गावर एस. टी. बसेसच्या फेऱ्या सुरू करण्यात येत आहेत. याबाबतची माहिती गुहागर आगाराचे वरिष्ठ अधिकारी नांदलस्कर यांनी दिली. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण प्रवासी महासंघाचे ग्रामीण विभाग अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी केले आहे.

Web Title: Selected buses will run daily from Guhagar depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.