निवासी संकुलांची सुरक्षा धोक्यात!
By Admin | Updated: June 21, 2014 00:14 IST2014-06-21T00:14:10+5:302014-06-21T00:14:28+5:30
सांगलीकर भयभीत : प्रबोधन करून पोलीस थकले; घरफोड्यांची मालिका सुरूच

निवासी संकुलांची सुरक्षा धोक्यात!
सचिन लाड ल्ल सांगली
चोरट्यांच्या चोरी करण्याच्या पद्धतीत दिवसेंदिवस बदल होत असल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. गुरुवारी दुपारी चोरट्यांनी सांगली शहरातील निवासी संकुलांना (अपार्टमेंट) लक्ष्य करून दहा सदनिका फोडल्या. एकाचदिवशी दहा सदनिका फोडल्याच्या घटना काही नवीन राहिलेल्या नाहीत. चोरट्यांनी अवघ्या दीड-दोन तासात हात मारून पोबारा केला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी पाहणी केलेल्या एकाही सदनिकेत रखवालदाराची नियुक्ती केलेली नाही, कोठेही कॅमेरा नाही. कोणीही यावे आणि जावे, अशी स्थिती आहे. सुरक्षेसाठी किमान रखालदाराची नियुक्ती करावेत, यासाठी पोलिसांनी अनेकदा प्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेतले. परंतु त्याचा सांगलीकरांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे वाढत्या चोऱ्यांच्या घटनांवरून दिसून येते. बाहेरील जिल्ह्यातील गुन्हेगारांनी सांगलीत शिरकाव केल्याने पोलीस यंत्रणा चक्रावून गेली आहे. गुन्हेगार सापडूनही चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत.