दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा आज पाच केंद्रांवर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:38 IST2021-09-04T04:38:03+5:302021-09-04T04:38:03+5:30
रत्नागिरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा २०२० शनिवार, दि. ४ सप्टेंबर ...

दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा आज पाच केंद्रांवर होणार
रत्नागिरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा २०२० शनिवार, दि. ४ सप्टेंबर रोजी शहरातील ५ उपकेंद्रांवर होणार आहे. ही परीक्षा सकाळी ११ ते १२ यावेळेत होणार असून, १६८९ उमेदवार ही परीक्षा देणार आहेत.
शहरातील पाच केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, बैठक व्यवस्था अशी आहे. गोगटे - जोगळेकर महाविद्यालय (RT००१००१ ते RT००१४३२), पटवर्धन हायस्कूल (RT००२००१ ते RT००२४०८), अजिजा दाऊद नाईक हायस्कूल (RT003001 ते RT003216), एम. एस. नाईक हायस्कूल (RT004001 ते RT004240), फाटक हायस्कूल (RT005001 ते RT005393).
लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांमध्ये कॉपीचा, गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी आयोगाकडून संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे. परीक्षांकरिता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी ((Frisking) करण्यात येणार आहे. आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक, भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत़, असे निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांनी कळविले आहे.