शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचा तडाखा वाढता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. वर्षभराच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. वर्षभराच्या कालावधीत ४१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला असून, एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात अडीच हजार अधिक रुग्ण सापडले असून, १५ दिवसांत तब्बल ३९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये पन्नाशीच्या वरील वयाच्या रुग्णांचा अधिक समावेश आहे. दुबईहून शृंगारतळी (ता. गुहागर) येथे आलेली व्यक्ती १८ मार्च, २०२० रोजी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. हा रुग्ण जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण ठरला होता. खेड तालुक्यातील कळंबणी रुग्णालयात ८ एप्रिल, २०२० रोजी कोरोना रुग्णाने अखेरचा श्वास घेतला होता. तो रुग्ण जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला बळी ठरला असून, तो अलसुरे (ता. खेड) गावातील होता.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला असून, या निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. एप्रिल महिन्यामध्ये तर कोरोनाचा कहर वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरांसह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाचा प्रसार सुरू झाला आहे.

एप्रिल महिन्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. ज्यांना कोणतीच लक्षणे नाहीत, अशा लोकांकडून कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होत आहे. एप्रिलच्या १५ दिवसांत जिल्ह्यात २,५९२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले असून कोरोनाबाधितांची संख्या १३,६२१ झाली आहे. आतापर्यंत १०,०१५ रुग्ण बरे झाले आहेत. मृतांची संख्या आता ४१५ झाली असून त्यांचे प्रमाण ३.४ टक्के आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याआधी रत्नागिरी जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात १३० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबरमध्ये ५२ रुग्ण दगावले. मात्र त्यानंतर मृतांच्या संख्येत चांगली घट झाली. नोव्हेंबर २०२० पासून मार्च २०२१ पर्यंत हे प्रमाण मर्यादित होते. मात्र एप्रिल महिन्यात हे प्रमाण खूपच वाढले आहे.

लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना झाला तरी त्यातून धोका खूप कमी होतो. मात्र अजूनही लसीकरणाची गती वाढलेली नाही. त्यामुळे मृतांच्या संख्येवर अजून मर्यादा आलेली नाही. हीच बाब आरोग्य विभागासाठी अधिक चिंतेची आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची प्रत्येक महिन्यातील संख्या -

महिना रुग्णांच्या मृत्यूची संख्या

एप्रिल, २०२० ०१

मे २०२० ०९

जून २०२० १६

जुलै २०२० ३५

सप्टेंबर २०२० १३०

ऑक्टोबर २०२० ५२

नोव्हेंबर २०२० ०३

डिसेंबर २०२० ०९

जानेवारी २०२१ २१

फेब्रुवारी २०२१ १६

मार्च २०२१ ११

१५ एप्रिल २०२१ ३९

तालुकानिहाय कोरोना मृतांची संख्या -

रत्नागिरी १०६

खेड ६१

गुहागर १४

दापोली ४७

चिपळूण ९८

संगमेश्वर ४७

लांजा १५

राजापूर २१

मंडणगड ०६