शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: लाखो रुपये ॲडव्हान्स घेऊन खलाशांचा पोबारा, नौकामालक आर्थिक संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 16:15 IST

आठ महिन्यांच्या बंदीनंतर पुन्हा पर्ससीननेट मासेमारी सुरू

रत्नागिरी : पर्ससीन नेट मासेमारी सुरू होऊन अद्याप महिनाही उलटलेला नाही, तोपर्यंत खलाशांनी आपल्या गावाकडे पलायन केले आहे. दिवसेंदिवस पलायनाच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे नौकामालकांना मोठा फटका बसल्याने ते आता नव्या संकटात सापडले आहेत. पळून जाणाऱ्या खलाशांमध्ये नेपाळी खलाशांची संख्या अधिक आहे.पर्ससीन नेटने मासेमारी केल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असली तरी त्यासाठी लागणाऱ्या खलाशांसाठी नौकामालकांना पायपीट करावी लागते. त्यासाठी काम करणाऱ्या स्थानिक खलाशांची संख्या कमी पडते. म्हणून नौका मालक कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल वा अन्य राज्यांतून खलाशी आणतात. आता नेपाळी खलाशीही अनेक नौकांवर काम करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.हे खलाशी आणण्यासाठी नौका मालकांना परराज्यात फेऱ्या माराव्या लागतात. अनेकदा हजारो रुपये ॲडव्हान्स दिले जातात. ही रक्कम घेऊनही काही महिने काम करून खलाशी पळून जातात. त्यामुळे नौकामालकांचे आर्थिक नुकसान होते. शिवाय खलाशांची संख्या कमी झाल्याने त्यांना स्वत:ला समुद्रात इतर खलाशांप्रमाणे जावे लागते.अजून मासे मिळण्याचे प्रमाण कमी आहे. त्यातच सततच्या वातावरणातील बदलामुळे अनेकदा मासेमारी बंद ठेवावी लागत आहे. तरीही खलाशांच्या जेवणाचा खर्च तसेच त्यांना मासिक पगारासह हप्ताही द्यावा लागतो. हजारोंचा हा खर्च भागवताना नौकामालकांना कसरत करावी लागत आहे.आठ महिन्यांच्या बंदीनंतर पुन्हा पर्ससीननेट मासेमारी सुरू झालेली आहे. अशा वेळी मालकांना साथ देण्यापेक्षा अनेक खलाशांनी पलायन केल्याचे नौकामालकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे नौकामालक अडचणीत आले आहेत. अनेक खलाशांना लाखो रुपये ॲडव्हान्स दिले आहेत. पलायन केलेल्या खलाशांकडून ॲडव्हान्स रक्कम वसूल कशी करायची, असा प्रश्न नौकामालकांना सतावत आहे. नौकामालक संकटात असताना त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

आणखी एक संकटपर्ससीन नौकेवर २५ ते ३० खलाशी लागतात. जिल्ह्यात खलासी मिळवताना अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे नौकामालकांना अन्य राज्यांमधून खलाशी आणावे लागतात. त्यासाठी खर्चही मोठा असतो. आधीच डिझेल खर्चाइतके मासे मिळत नसल्याने नौकामालक अडचणीत आहेत. त्यात खलाशांच्या पलायनाने मालकांसमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Sailors Flee with Advances, Boat Owners Face Financial Crisis

Web Summary : Ratnagiri boat owners are in crisis as sailors, often Nepalese, abscond after taking advances. Owners face losses and must work at sea themselves. Poor catches and weather add to their financial woes. They struggle to pay wages amid these desertions.