स्कॉर्पिओच्या धडकेने

By Admin | Updated: July 26, 2015 00:01 IST2015-07-25T23:57:13+5:302015-07-26T00:01:10+5:30

कोंडगाव वाणीवाडी येथील पेट्रोल पंपासमोर

Scorpio's Shock | स्कॉर्पिओच्या धडकेने

स्कॉर्पिओच्या धडकेने

देवरूख : रस्ता ओलांडत असताना एका भरधाव स्कॉर्पिओने धडक दिल्याने तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी १.४५ वा. च्या सुमारास कोंडगाव वाणीवाडी येथील पेट्रोल पंपासमोर घडली. सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील निलेश मारूती कांबळे (२७) हा मयत झाला आहे.
निलेश हा रत्नागिरी येथील एका जेसीबीवर चालक म्हणून काम करीत होता. तो साखरपा येथून गावाकडे जाण्यासाठी निघाला होता. मात्र चुकून तो कोल्हापूर गाडी ऐवजी रत्नागिरी बसमध्ये बसला. गावाकडे जाण्याचे तिकीट वाहकाकडे मागत असताना वाहकाने ही बस रत्नागिरीकडे जात असल्याचे सांगून त्याला गाडीतून उतरवले. यावेळी नीलेश मार्ग ओलांडून पलिकडच्या बस थांब्याकडे जाण्यास निघाला होता. हा मार्ग ओलांडत असताना कराड (सातारा) येथील कोल्हापूरवरून गणपतीपुळे येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओने (एमएच ४३- एबी-२५३८) निलेशला जोराची धडक दिली. रक्तस्त्राव झाल्याने नीलेशचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात होताच स्कॉर्पिओ चालकाने तेथून पलायत केले. त्याच्या शोधासाठी पोलीसांनी सर्व मार्गावर नाकाबंदी केली. आरवली येथील वाहतूक पोलीस भूषण सावंत यांनी ही गाडी भरधाव वेगाने जात असताना पकडली. (प्रतिनिधी)

Web Title: Scorpio's Shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.