राजापूर : सातत्याने मागणी करुन देखील शिक्षक न दिल्याने संतापलेल्या उपळे ग्रामस्थांनी बुधवारी राजापूर पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनातच सर्व विद्यार्थ्यांना आणुन बसविले व तेथेच शाळा भरविली. ग्रामस्थांच्या मागणीनुसार तत्काळ शिक्षक देतो, असे ठोस आश्वासन प्रशासनाकडून मिळाल्यानंतरच विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांचे दालन सोडले. मात्र दिल्या आश्वासनानुसार शिक्षक न मिळाल्यास पुन्हा गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनात विद्यार्थी आणून बसवू, असा इशारा माजी सभापती कमलाकर कदम यांनी दिला आहे.दरम्यान, उपळे नंबर २ या शाळेवर शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली असून, जर तो हजर न झाल्यास त्याच्यावर कारवाई करणार असल्याचे गटविकास अधिकारी सागर पाटील यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील उपळे नंबर २ ही शाळा सातवीपर्यंत असून, एकूण बावीस विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत व केवळ एक शिक्षक या सर्वांना शिकवतो. त्यामुळे या शाळेसाठी आणखी एक शिक्षक दिला जावा, अशी मागणी मागील काही दिवसांपासून सुरु होती.मात्र, येथील प्रशासनाने केवळ तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. त्यामुळे उपळेवासीय ग्रामस्थ संतापले जर शिक्षक नाही दिलात तर २४ जुलैला राजापूर पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनात विद्यार्थी आणून बसवू, असा इशारा माजी सभापती कमलाकर कदम यांनी दिला होता. गटशिक्षणाधिकारी यांच्याच दालनात शाळा भरल्याने एकच गोंधळ उडाला. दरम्यान, गटविकास अधिकारी सागर पाटील व सहाय्यक गटविकास अधिकारी सुशांत एकल तेथे हजर झाले गटविकास अधिकाऱ्यांनी एकूण परिस्थितीचा आढावा घेतला.
गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनातच भरली शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 16:38 IST
सातत्याने मागणी करुन देखील शिक्षक न दिल्याने संतापलेल्या उपळे ग्रामस्थांनी बुधवारी राजापूर पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनातच सर्व विद्यार्थ्यांना आणुन बसविले व तेथेच शाळा भरविली. ग्रामस्थांच्या मागणीनुसार तत्काळ शिक्षक देतो, असे ठोस आश्वासन प्रशासनाकडून मिळाल्यानंतरच विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांचे दालन सोडले. मात्र दिल्या आश्वासनानुसार शिक्षक न मिळाल्यास पुन्हा गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनात विद्यार्थी आणून बसवू, असा इशारा माजी सभापती कमलाकर कदम यांनी दिला आहे.
गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनातच भरली शाळा
ठळक मुद्देगटशिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनातच भरली शाळाआश्वासन प्रशासनाकडून मिळाल्यानंतरच दालन सोडले