एलईडी मासेमारीच्या दुष्परिणामांचे देखावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:37 IST2021-09-15T04:37:09+5:302021-09-15T04:37:09+5:30
दापोली : कोकणात एलईडी मासेमारीमुळे मासेमारी व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. शासनाकडून एलईडी मासेमारीवर बंदी असली तरी बेकायदेशीरपणे एलईडी ...

एलईडी मासेमारीच्या दुष्परिणामांचे देखावे
दापोली : कोकणात एलईडी मासेमारीमुळे मासेमारी व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. शासनाकडून एलईडी मासेमारीवर बंदी असली तरी बेकायदेशीरपणे एलईडी मासेमारी सुरू आहे. त्याचाच आधार घेत दापोली तालुक्यातील पाजपंढरी गावातील मच्छिमार सुरेश कुलाबकर यांनी आपल्या गणपतीसमोर एलईडी मासेमारीच्या दुष्परिणामांचा देखावा साकारण्यात आला आहे. केवळ एकच नाही तर अनेक मच्छिमारांनी असे देखावे सादर केले आहेत.
एलईडी मासेमारीमुळे मत्स्य साठे संपुष्टात येऊन कोकणातील पारंपरिक मच्छिमार देशोधडीला लागले आहेत. त्यामुळे एलईडी मासेमारी हद्दपार करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. त्यासाठी पारंपरिक मच्छीमारांनी वेळोवेळी उपोषण आंदोलनेही केली आहेत. त्याची दखल घेत सरकारने त्यावर बंदी घातली असली तरी बेकायदेशीर पद्धतीने ही मासेमारी सुरूच आहे. त्यामुळे आता गणपती बाप्पाला साकडे घालत मच्छिमार बांधवांनी एलईडी देखाव्यातून प्रबोधन करण्याचे ठरविले आहे. एलईडीचा भस्मासूर नष्ट कर, पारंपारिक मच्छिमारांना चांगले दिवस येऊ दे भरभराटी होऊ दे, सर्वांचे कल्याण कर असे साकडे गणरायला घालणारे देखावे किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांनी ठिकाणी उभारले आहेत.