कोकण मर्कंटाईल बँकेत घोटाळा

By Admin | Updated: October 4, 2014 23:51 IST2014-10-04T23:51:22+5:302014-10-04T23:51:22+5:30

नकली दागिने ठेवून २.८२ कोटींची फसवणूक

Scam in Konkan Mercantile Bank | कोकण मर्कंटाईल बँकेत घोटाळा

कोकण मर्कंटाईल बँकेत घोटाळा

देवरुख : नकली दागिन्यांवर कर्ज घेऊन तब्बल ३९ जणांच्या टोळक्याने कोकण मर्कंटाईलमध्ये घोटाळा केल्याची धक्कादायक खबर उघड झाली असून, त्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तब्बल दोन कोटी ८२ लाख ७७ हजार ६४९ रुपयांना गंडा घालण्यात आला असून, याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोकण मर्कंटाईल बँकेच्या मुख्य शाखेने सोन्याचे दागिने तपासण्याचे यंत्र संगमेश्वरच्या शाखेत आणले होते. उदाहरणादाखल काही दागिने तपासण्यात आले असता ते दागिने नकली असल्याचे पुढे आले. त्यामुळे संपूर्ण बँकेतच खळबळ उडाली. ११ मे २०१२ ते १९ सप्टेंबर २०१४ या कालावधीत ठेवलेले दागिने हे बनावट असल्याचे पुढे आले आहे.
३९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तब्बल ३९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये सोनार प्रमोद सैतवडेकर व उदय सैतवडेकर (संगमेश्वर), सुचित्रा महाडिक, रहिसा नायकोडी, हफिजा नायकोडी, हिदायत दळवी, अरिफा सय्यद (सर्व कसबा - संगमेश्वर), विनोद कुळ्ये, आफताब शहा, आसमा शेख (कसबा), नौशाद खान (कोंड्ये), शौकत अलवारे, अली मेमन (पेठमाप), मेताज तांबे (मालदोली), अझरा बोदले (देवरुख), अतिसा काझी (कळंबस्ते), खरमान महाडिक, खतिबा बेबल (कसबा), मरींआबी फिलवान (कोंडीवरे), फरजाना तांबे (नायरी), रजिया गुलाम जियानी कुरेशी (माखजन), मोहनलाल रजापती, सुलेमान खान (कोंडीवरे), यासीम नाईक, बिल्कीश कालसेकर (कोंडीवरे), दिनार दिलीप पवार, सतीश गमरे (खेड), इक्बाल मुल्लाजी (कळंबस्ते), झहीर कोलथरकर (कोंड्ये), नसीमा नाईक (कसबा), राजेश महाडिक, जहिदा आंबेडकर, समुदा केदकर (आंबेड बुदु्रक), नुरजहा शहा दखनी, नसीना मुल्ला (संगमेश्वर), साजीया मुल्ला, फरिमा नाईक (कसबा), तौफिक सादीम (रत्नागिरी), नाजीरखान मापारी (मुचरी) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
संगनमताने बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी या सर्वांविरुद्ध भा.दं.वि. कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक मनोहर चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Scam in Konkan Mercantile Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.