हर्णे गावासाठी साेमवारची रात्र ठरली वैऱ्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:38 IST2021-09-08T04:38:02+5:302021-09-08T04:38:02+5:30

शिवाजी गोरे / दापाेली : मध्यरात्रीनंतर लोक साखरझोपेत असताना, घरावर थाप पडली आणि घरे खाली करा, असा आवाज आला ...

Saturday night was the enemy's day for Harne village | हर्णे गावासाठी साेमवारची रात्र ठरली वैऱ्याची

हर्णे गावासाठी साेमवारची रात्र ठरली वैऱ्याची

शिवाजी गोरे / दापाेली : मध्यरात्रीनंतर लोक साखरझोपेत असताना, घरावर थाप पडली आणि घरे खाली करा, असा आवाज आला आणि बहुतांश गावकऱ्यांनी रात्र जागूनच काढली. हा प्रकार होता दापोली तालुक्यातील हर्णे गावात सोमवारी रात्री घडलेला.

अति मुसळधार पावसाने सोमवारी रात्री हर्णे गावाला चांगलेच झोडपून काढले आणि बाजारपेठेमध्ये सर्वत्र तीन ते चार फूट पाणी घुसले. त्यामुळे रात्री अचानक तीन वाजता लोकांना घरे खाली करण्यास सांगण्यात आले. साखर झोपेत असलेल्या लोकांना काही काळ नेमका प्रकार कळला नाही. अनेक लोकांचे रात्रीच स्थलांतरही करण्यात आले. अचानक हर्णे गावाला पुराचा वेढा पडला आणि रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे भीतिपोटी लोकांनी रात्र जागून काढली. हर्णे गावातील अनेक वाड्यांमध्ये अशा प्रकारची पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने लोकांमध्ये चिंता पसरली आहे.

Web Title: Saturday night was the enemy's day for Harne village