शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील 'या' दोन पहिल्या सौर शाळा; वीजबिल शून्य होणार, वर्षाला सुमारे दोन लाखांची बचत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 16:23 IST

महावितरणला वीज विकणार

रत्नागिरी : महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिका यांनी पुरस्कृत केलेल्या पंचम एकात्मिक ग्रामविकास प्रकल्पांतर्गत तालुक्यातील सत्कोंडी व कांबळेलावगण येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये ८ किलो वॅटचा सोलर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या दोन्ही शाळा जिल्ह्यातील पहिल्या सौर शाळा झाल्या आहेत. या शाळांवर तब्बल साडेपाच लाखांचे सौर पॅनल बसविण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही शाळांचे वीजबिल शून्य होणार असून, वर्षाला सुमारे दोन लाख रुपयांची बचत होणार आहे.सत्कोंडीमधील स्व. अनंतराव बैकर बहुउद्देशीय संकुलातील प्राथमिक शाळा, ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय, ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, अंगणवाडी, महिला उद्योग प्रशिक्षण केंद्र, व्यायामशाळा, वॉटर एटीएम या सर्व आस्थापनांना तसेच कांबळेलावगण येथील प्राथमिक शाळा, अंगणवाडी वॉटर एटीएम, बोअरवेल यांना सौरऊर्जा पुरवठा सुरू झाला आहे.

या प्रकल्पाकरिता हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी लांजा ही संस्था समन्वय संस्था म्हणून काम करीत आहे. या दोन्ही सौर शाळांचे उद्घाटन महाराष्ट्र फाउंडेशनच्या संचालिका रेश्मा सांबरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला पंचम प्रकल्प समन्वयक दत्ता गुरव, सहायक प्रकल्प समन्वयक चेतन वाघ, हेरिटेजचे संस्थापक पत्रकार संतोष कांबळे, सत्कोंडीचे सरपंच सतीश थूल, उपसरपंच चंद्रकांत मालप, पंचमप्रमुख भाऊ काताळे, संजय बैकर, प्रकाश मालप, पी स्वेअर कंपनीचे वैभव छत्रे, ग्रामपंचायतीचे सदस्य अजय काताळे, प्रणाली मालप, समीक्षा घाटे, निकिता शिवगण, कवी अरुण मोर्ये, तंटामुक्त समिती अध्यक्ष केशव बलेकर, पोलिस पाटील श्रीकांत खापले, कार्यकर्ते संजय बलेकर, सत्कोंडी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष पालये, कांबळेलावगण शाळेचे मुख्याध्यापक सुशील वासावे, दोन्ही शाळांचे शिक्षक, गाव विकास समिती सदस्य, स्वयंसहाय्यता गटाच्या महिला, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

महावितरणला वीज विकणारसत्कोंडीमधील सोलर प्रकल्पामध्ये वर्षाला ७००० युनिट्स वीजनिर्मिती हाेणार आहे. तसेच कांबळेलावगण येथे वर्षाला ४५०० युनिट्स वीजनिर्मिती होणार आहे. या शाळा महावितरणला वीज विकत देणार आहेत.