शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाच्या प्रबळ इच्छेने सरपंचबाई झाल्या दहावी पास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 16:26 IST

आपले सहकारी शिक्षित आणि आपले शिक्षण कमी याचे शल्य टोचत राहिल्याने त्यांनी यावर्षी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. काैटुंबिक जबाबदारी सांभाळत त्यांनी परीक्षा दिली आणि ५२ टक्के गुणही मिळविले.

मेहरून नाकाडेरत्नागिरी : शिक्षणाची ओढ आणि आवड असेल तर शिक्षणासाठी वयाचे बंधन नसतेच, हे दाखवून दिले आहे भातगाव (ता. रत्नागिरी) येथील सरपंच रेणुका सागर आग्रे यांनी. आपले सहकारी शिक्षित आणि आपले शिक्षण कमी याचे शल्य टोचत राहिल्याने त्यांनी यावर्षी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. काैटुंबिक जबाबदारी सांभाळत त्यांनी परीक्षा दिली आणि ५२ टक्के गुणही मिळविले.काैटुंबिक जबाबदारी व परिस्थितीमुळे रेणुका यांना २००३ साली सातवीनंतर शिक्षण थांबवावे लागले. २०११ साली भातगाव गोळेवाडी येथील सागर महादेव आग्रे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतरही त्या कुटुंबाच्या जबाबदारीत व्यस्त झाल्या. पतीचा रंगकामाचा व्यवसाय. त्यांना एक मुलगा व एक मुलगी, सासू, सासरे व पती मिळून त्यांच्या कुटुंबात एकूण सहा व्यक्ती आहेत. सहाजणांचे कुटुंब तसेच घरची शेती, त्यामुळे पहाटे ४ वाजल्यापासून दिनक्रम सुरू होतो.भातगाव ग्रामपंचायतीच्या २०२१ साली निवडणुकीत त्या सरपंचपदी विराजमान झाल्या. गावाच्या प्रथम नागरिकाचा सन्मान प्राप्त झाला असला तरी सोबतचे सहकारी शिक्षित आहेत. गावाचा कारभार चालवायचा म्हटलं तर आपणही शिकले पाहिजे, असे राहून राहून वाटायला लागले. त्यांनी पती सागर व सासरे महादेव यांचेकडे शिकण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी या निर्णयाचे स्वागत करून पाठिंबा दिला.पतीसाेबत मिरजोळी हायस्कूल येथे १७ नंबरचा फाॅर्म भरला. दर शनिवारी त्यांना शाळेत जावे लागे. शाळेतून आल्यावर त्यांना आठवडाभराचा दिलेला गृहपाठ, अभ्यास न चुकता पूर्ण करावा लागे. लहान मुले व कुटुंबातील अन्य घटकांमुळे स्वयंपाकापासून अन्य सर्व कामे आटोपून अभ्यासाला बसावे लागे. घरातील कामे, ग्रामपंचायतीची जबाबदारी यामुळे रात्री ११ ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत त्या अभ्यासाला वेळ देत. परीक्षेला आबलोली केंद्र आले आणि केंद्रावर साेडणे-आणणे यासाठी पतीची मदत झाली. आता त्यांनी पुढे बारावी करून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsarpanchसरपंचexamपरीक्षा