शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri Crime: जमिनीच्या वादातून पेंडखळेच्या सरपंचावर कोयत्याने वार

By अरुण आडिवरेकर | Updated: July 4, 2023 18:59 IST

राजापूर : जमिनीभोवती घातलेल्या कुंपणावरून पेंडखलेचे सरपंच राजेश हरिश्चंद्र गुरव (५०) यांच्यावर कोयतीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. ...

राजापूर : जमिनीभोवती घातलेल्या कुंपणावरून पेंडखलेचे सरपंच राजेश हरिश्चंद्र गुरव (५०) यांच्यावर कोयतीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. ४ जुलै) सकाळच्या सुमारास पेंडखले वठारवाडी येथे घडली. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी दत्ताराम महादेव सुर्वे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. जखमी राजेश गुरव यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीला नेण्यात आले आहे.पेंडखले गावचे सरपंच राजेश हरिश्चंद्र गुरव यांच्या गावातील वठारवाडी येथील जमिनीभोवती कुंपण घालण्यात आले आहे. हे कुंपण त्याच वाडीतील दत्ताराम महादेव उर्फ डी. एम. सुर्वे तोडत असताना राजेश गुरव दुचाकीवरून जात होते. आपले कुंपण तोडले जात असल्याचे त्यांनी पाहताच दुचाकी थांबवून त्यांनी दत्ताराम सुर्वे याला विचारणा केली. त्यावेळी दोघात वादावादी झाली. दरम्यान दत्ताराम सुर्वे याने हातातील कोयतीने गुरव यांच्यावर वार केला. त्यामध्ये गुरव यांच्या डाव्या डोळ्याखाली जखम झाली. या हल्ल्यात ते दुचाकीसह खाली पडले. त्यानंतर सुर्वे याने कोयतीच्या विरुद्ध बाजूने गुरव यांच्या खांद्यावर मारहाण केली.जखमी अवस्थेतील राजेश गुरव यांना राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार करून अधिक उपचारासाठी रत्नागिरीला नेण्यात आले. या हल्ल्याप्रकरणी दत्ताराम सुर्वे याच्या विरुध्द राजापूर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी हल्ल्यात वापरलेली कोयती जप्त केली आहे. दरम्यान, दत्ताराम सुर्वे याच्या पत्नीला धक्काबुकी केल्याची तक्रार पोलिस स्थानकात करण्यात आली आहे. याप्रकरणी हेडकॉन्स्टेबल के. एस. पाटील अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस