सरस्वती पवार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:23 IST2021-06-05T04:23:22+5:302021-06-05T04:23:22+5:30

शिल्पा भडाळे रत्नागिरी : शहरातील नाचणे राेड येथील शिल्पा दिनेश भडाळे (४६) यांचे बुधवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ...

Saraswati Pawar passes away | सरस्वती पवार यांचे निधन

सरस्वती पवार यांचे निधन

शिल्पा भडाळे

रत्नागिरी : शहरातील नाचणे राेड येथील शिल्पा दिनेश भडाळे (४६) यांचे बुधवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्या मूळच्या देवरूख येथील रहिवासी हाेत्या. काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू हाेते. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, सासू, नणंदा असा परिवार आहे.

महादेव तिर्लाेटकर

राजापूर : तालुक्यातील उन्हाळे माेंडेवाडी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ महादेव अंतू तिर्लाेटकर (७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, एक मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे़

दत्ताराम काळंबे

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील राजीवली ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ताराम देवजी काळंबे (५२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

अनंत पालशेतकर

गुहागर : तालुक्यातील पालशेत येथील उद्याेजक अनंत पांडुरंग पालशेतकर (९३) यांचे मुंबई - वरळी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. स्त्रीराेग तज्ज्ञ डाॅ. नंदिता पालशेतकर यांचे ते सासरे हाेत.

Web Title: Saraswati Pawar passes away