उन्हवरे येथील पूरग्रस्त भागाची संजय कदम यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST2021-07-18T04:23:06+5:302021-07-18T04:23:06+5:30

दापोली : उन्हवरे परिसरात मुसळधार पावसामुळे उन्हवरे, वावघर, फरारे येथील रहिवाशांच्या घरात पाणी शिरून खूप मोठी हानी झाली. किराणामाल, ...

Sanjay Kadam inspects the flood affected area at Unhavare | उन्हवरे येथील पूरग्रस्त भागाची संजय कदम यांनी केली पाहणी

उन्हवरे येथील पूरग्रस्त भागाची संजय कदम यांनी केली पाहणी

दापोली : उन्हवरे परिसरात मुसळधार पावसामुळे उन्हवरे, वावघर, फरारे येथील रहिवाशांच्या घरात पाणी शिरून खूप मोठी हानी झाली. किराणामाल, हॉटेल व्यावसायिकांचेही फार नुकसान झाले. माजी आमदार संजय कदम यांनी घटनास्थळी जाऊन साऱ्याची पाहणी केली.

यावेळी सभापती योगिता बांद्रे, उपसभापती मनोज भांबीड, माजी उपसभापती व उन्हवरे गणाच्या विद्यमान सदस्या ममता शिंदे, सरपंच प्राची पवार, माजी उपसरपंच मंगेश शिंदे, ग्रामसेवक श्री. गजने, कृषी विस्तार अधिकारी अतुल पाटील, राजाराम पवार, संतोष संमजीस्कर आदी उपस्थित होते.

अचानक झालेली ढगफुटी आणि उन्हवरे नदीत साठलेल्या गाळामुळे पुराचे पाणी इतरत्र घुसून शेतीचे आणि घरांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. उन्हवरे येथे प्रसिद्ध असलेल्या गरम पाण्याच्या कुंडांनाही धोका पोहोचून ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. नदीचा गाळ काढणे आणि नदीच्या दोन्ही बाजूने संरक्षक बंधारा बांधून मिळणे, यासाठी ग्रामस्थांनी माजी आमदार संजय कदम यांच्याकडे मागणी केली. जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून ही समस्या दूर करण्याचे आश्वासन संजय कदम यांनी ग्रामस्थांना दिले.

Web Title: Sanjay Kadam inspects the flood affected area at Unhavare