चिपळूण तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्षपदी संजय चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST2021-07-09T04:20:38+5:302021-07-09T04:20:38+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी आदर्श विद्यामंदिर, चिवेली या विद्यालयाचे मुख्याध्यापक ...

Sanjay Chavan as Chiplun Taluka Headmaster Association President | चिपळूण तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्षपदी संजय चव्हाण

चिपळूण तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्षपदी संजय चव्हाण

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी आदर्श विद्यामंदिर, चिवेली या विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी बोरगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर गलांडे यांची निवड करण्यात आली.

चिपळूण तालुका मुख्याध्यापक संघाच्या ऑनलाईन सभेत ही नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून संजू वाघमारे व संजय वरेकर यांची तर सहसचिव म्हणून मंदार सुर्वे, खजिनदार म्हणून विजय पारवे, विद्या समिती सचिव रामचंद्र आरेकर यांची निवड करण्यात आली. तर कार्यकारिणी सदस्य म्हणून रामचंद्र महाडिक, धनाजी देसाई, राजेंद्र वारे, तानाजी कांबळे, राम गाडवे, लक्ष्मण ढेंगे, राजेंद्र जाधव व मनोज घाग यांची निवड करण्यात आली. मार्गदर्शक म्हणून अनिल घाग यांची निवड करण्यात आली.

Web Title: Sanjay Chavan as Chiplun Taluka Headmaster Association President