चिपळूण काँग्रेसतर्फे कामथे उपजिल्हा रुग्णालयाचे सॅनिटायझेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST2021-06-30T04:20:21+5:302021-06-30T04:20:21+5:30
अडरे : कोरोना संकटकाळात रुग्णांची सेवा बजावण्यात महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या कामथे उपजिल्हा रुग्णालयाचे चिपळूण काँग्रेसतर्फे सॅनिटायझेशन करण्यात आले. ...

चिपळूण काँग्रेसतर्फे कामथे उपजिल्हा रुग्णालयाचे सॅनिटायझेशन
अडरे : कोरोना संकटकाळात रुग्णांची सेवा बजावण्यात महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या कामथे उपजिल्हा रुग्णालयाचे चिपळूण काँग्रेसतर्फे सॅनिटायझेशन करण्यात आले. यावेळी चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाचे सावट आहे. कोरोना कधी संपेल, याची कोणतीही शाश्वती नाही. मात्र, या काळात चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी मास्क, सॅनिटायझरसह अन्य साहित्य वाटप करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी कामथे उपजिल्हा रुग्णालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी तसेच रुग्णांकरिता ५ हजार मास्कचे वाटप केले होते.
तर आता सॅनिटायझेशन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती विजय देसाई, राजू जाधव, युवक काँग्रेस चिपळुणात शहराध्यक्ष फैसल पिलपिले, कृष्णा महाडिक उपस्थित होते.