संगमेश्वरात वृद्धावर काेयतीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:22 IST2021-07-11T04:22:28+5:302021-07-11T04:22:28+5:30

साखरपा : गवत फवारणीच्या औषधावरून झालेल्या वादातून एका वृध्दावर कोयतीने वार केल्याची घटना शनिवारी १० जुलै रोजी दुपारी ३ ...

In Sangameshwar, the old man was physically attacked | संगमेश्वरात वृद्धावर काेयतीने वार

संगमेश्वरात वृद्धावर काेयतीने वार

साखरपा : गवत फवारणीच्या औषधावरून झालेल्या वादातून एका वृध्दावर कोयतीने वार केल्याची घटना शनिवारी १० जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी - रेणुसेवाडी येथे घडली. याप्रकरणी तीन जणांविरोधात देवरूख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवरूख पोलीस स्थानकातून दिलेल्या माहितीनुसार, याबाबत राजाराम संभाजी शेलार (६५) यांनी फिर्याद दिली आहे. विठ्ठल रेणुसे, महेश रेणुसे व मालती रेणुसे अशी गुन्हा दाखल केलेल्या तिघांची नावे आहेत. राजाराम शेलार हे शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेतामध्ये गवत फवारणीचे औषध मारण्यासाठी गेले होते. यावेळी महेश रेणुसे व मालती रेणुसे गवत फवारणीच्या औषधाचा आम्हाला त्रास होतो हे सांगण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली.

या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले आणि राजाराम शेलार यांना काठीने मारहाण करण्यात आली. त्यानंतर महेश रेणुसे याने राजाराम शेलार यांच्या पायावर काेयतीने वार केला. या हल्ल्यात राजाराम शेलार यांना गंभीर दुखापत झाली आहे. राजाराम शेलार यांना उपचारासाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. दुखापत गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार संजय मारळकर, पोलीस नाईक हेमा गोतावडे, वैभव कांबळे, प्रशांत नागवेकर, किरण देसाई यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला. याप्रकरणी महेश रेणुसे, विठ्ठल रेणुसे व मालती रेणुसे यांच्यावर देवरूख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास अंमलदार संजय मारळकर करीत आहेत.

Web Title: In Sangameshwar, the old man was physically attacked