जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप हातणकर यांचे निधन
By Admin | Updated: March 29, 2015 01:04 IST2015-03-29T01:02:42+5:302015-03-29T01:04:47+5:30
काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप हातणकर यांचे निधन
राजापूर : राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप लक्ष्मण हातणकर (वय ४५) यांचे शनिवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.
मागील काही महिने ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करून दुसरी किडनी बदलली जाणार होती. तत्पूर्वी त्यांचे निधन झाले. राजापूर तालुका काँग्रेसचे निष्ठावंत व कार्यकर्ते म्हणून संदीप हातणकर यांची ओळख होती. राजापूर तालुका काँग्रेसचे ते उपाध्यक्ष होते. यापूर्वी पाच वर्षे त्यांनी केळवली जिल्हा परिषद विभागाचे सदस्य म्हणून मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावली होती. राजापूर तालुक्यातील सहकार क्षेत्रात त्यांचा मोठा सहभाग राहिला. तालुका कुणबी पतपेढीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहताना बँकेला चांगले स्थान प्राप्त करून दिले होते.
माजी पालकमंत्री व राज्याचे माजी बांधकाम राज्यमंत्री ल. रं. तथा भाई हातणकर यांचे ते सुपुत्र होत. दोन वर्षांपूर्वी भाई हातणकर यांचे निधन झाले होते, तर त्यांचे ज्येष्ठ बंधू विजय हातणकर हेदेखील दहा वर्षांपूर्वीच (पान ९ वर)