लांजात एकाच दिवशी आढळले ५६ पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST2021-05-12T04:32:45+5:302021-05-12T04:32:45+5:30
लांजा : तालुक्यात सोमवारी कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याने दिलासा मिळाला असतानाच मंगळवारी मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने चिंता ...

लांजात एकाच दिवशी आढळले ५६ पाॅझिटिव्ह
लांजा : तालुक्यात
सोमवारी कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याने दिलासा मिळाला असतानाच मंगळवारी मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने चिंता वाढली आहे. रिंगणे बौद्धवाडी येथे कोरोनाचे तब्बल २९ रुग्ण आढळले असून, तालुक्यात एकूण ५६ रुग्ण आढळले. तालुक्यातील काेराेनाबाधितांची संख्या १६९० इतकी झाली आहे़
गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये ३ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.
सोमवारी तालुक्यात कोरोनाचे १९ रुग्ण आढळल्याने दिलासा मिळाला होता, तर मंगळवारी तालुक्यात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली. यामध्ये रिंगणे बौद्धवाडी येथे २९ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी अँटिजन चाचणीत १३, तर आरटीपीसीआरचे ४३ पाॅझिटिव्ह आले आहेत. यामध्ये मठ गांगरकरगाव ५, रिंगणे बौद्धवाडी २९, मठ कडूगाव २, वरची शिरवली सुदवाडी २, धुंदरे सुतारवाडी ४, वाकेड मावळतवाडी २, रुग्ण सडवली ४, वाकेड सावंतवाडी १, प्रभानवल्ली गुरववाडी १, धुंदरे १, लांजा शहर १, लांजा बसडेपो १, लांजा पोलीस वसाहत १, कुवे पुरागाव १ येथील रुग्ण आहेत. तालुक्यात १२१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर ४०३ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.