शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
3
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
4
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
5
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
6
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
7
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
8
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
9
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
10
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
11
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
12
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
13
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
14
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
15
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
16
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
17
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
18
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
19
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
20
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे

तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, रत्नागिरीत ४४ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2021 3:22 PM

Tobacco Ban Ratnagiri- रत्नागिरी शहरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या टपऱ्या आणि दुकानांवर सोमवारी सकाळी अचानक धाड टाकण्यात आली. या धाडीमध्ये ४४ टपरीधारक व दुकानदारांवर कारवाई करत त्यांच्याकडून ३० हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

ठळक मुद्देतंबाखूजन्य पदार्थांची विक्री, रत्नागिरीत ४४ दुकानदारांवर दंडात्मक कारवाईदुकानदारांकडून ३०,४०० रुपयांचा दंड वसूल

रत्नागिरी : शहरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या टपऱ्या आणि दुकानांवर सोमवारी सकाळी अचानक धाड टाकण्यात आली. या धाडीमध्ये ४४ टपरीधारक व दुकानदारांवर कारवाई करत त्यांच्याकडून ३० हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय, अन्न व औषध प्रशासन आणि रत्नागिरी शहर पोलीस स्थानक यांच्या संयुक्त भरारी पथकाने ही कारवाई केली. या पथकाने शहरात अचानक छापा टाकून दुकानदारांची झडती घेण्यास सुरुवात केली.

या तपासणीमध्ये काही दुकानदार दोषी आढळले असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर शहरातील टपरीधारक आणि दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. सिगारेट व अन्न तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात, मनाई आणि व्यापार व वाणिज्य उत्पादन आणि वितरण नियमन) कायदा २००३ (कोटपा कायदा २००३) अन्वये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली.ही कारवाई जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले-गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या भरारीपथकात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक सई धुरी, समुपदेशक प्राची आशिष भोसले, सामाजिक कार्यकर्ते सचिन भरणे, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी प्रशांत गुंजाळ, दशरथ बांभळे, पोलीस कॉन्स्टेबल रिशिता गावकर, पोलीसनाईक प्रवीण वीर व सहकारी मिलिंद कदम यांचा समावेश होता.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदीPoliceपोलिसRatnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी