दापोली अर्बन बँकेतर्फे कर्मचाऱ्यांसाठी पगार तारण कर्ज योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST2021-07-02T04:21:56+5:302021-07-02T04:21:56+5:30

दापोली : दापोली अर्बन बँकेतर्फे शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी पगार तारण कर्ज योजना राबविण्यात येणार आहे. ही याेजना दि. ...

Salary Mortgage Loan Scheme for Employees by Dapoli Urban Bank | दापोली अर्बन बँकेतर्फे कर्मचाऱ्यांसाठी पगार तारण कर्ज योजना

दापोली अर्बन बँकेतर्फे कर्मचाऱ्यांसाठी पगार तारण कर्ज योजना

दापोली : दापोली अर्बन बँकेतर्फे शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी पगार तारण कर्ज योजना राबविण्यात येणार आहे. ही याेजना दि. १ जुलैपासून सुरू करण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर यांनी दिली.

शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना हमीपत्राच्या तारणावर दापोली अर्बन बँकेकडून पगार तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्जदार व जामीनदार बँकेचे भागधारक सभासद असणे बंधनकारक आहे. कर्जदार हा बँकेच्या शाखा असलेल्या भागातील कायम रहिवासी असावा अथवा त्याची स्थावर मिळकत बँकेच्या शाखा असलेल्या रत्नागिरी/रायगड जिल्ह्यांमध्ये असावी. कर्ज रक्कम २ लाख किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास कर्जदाराचे स्वतःचे नावे असलेल्या घराचे उताऱ्यावर बँकेच्या कर्जाची बोजा नोंद करणे बंधनकारक आहे.

कर्जाच्या दरमहा हप्त्याची रक्कम कर्जदाराचे पगारातून प्रत्यक्ष कपात होऊन संबंधित कार्यालयातर्फे बँकेकडे जमा होणे आवश्यक आहे. त्यासाठी अर्जदाराने विहीत नमुन्यातील हमीपत्र कर्ज मागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. परतफेडीचा कालावधी १० वर्षे किंवा कर्जदाराची शिल्लक राहिलेली सेवा यापैकी कमी असलेल्या कालावधी इतका राहील, अशी माहिती अध्यक्ष जयवंत जालगावकर यांनी दिली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी थोरात, उपाध्यक्ष संदीप दिवेकर व संचालक मंडळ उपस्थित होते.

Web Title: Salary Mortgage Loan Scheme for Employees by Dapoli Urban Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.